Tuesday , April 21 2026
Breaking News

पत्रकारांसाठी बेळगाव महानगरपालिकेतर्फे आरोग्य विमा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतर्फे कार्यरत पत्रकारांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विमा सुविधा कार्डचे महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. महापालिका सभागृहात आज सोमवारी (10 जून) एकूण 88 पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आरोग्य विमा कंपनीच्या प्रतिनिधी श्रीकांत गुणारी यांनी सांगितले की, काही पत्रकारांना विम्याची सुविधा यापूर्वीच मिळाली आहे. राज्यातील ही सर्वोत्तम विमा योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा केंद्रातील त्यांच्या कुटुंबातील 270 सदस्य आणि 88 पत्रकारांसह एकूण 358 जणांना विम्याची सुविधा मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विमा कार्ड असलेल्या प्रत्येक पत्रकाराच्या कुटुंबाला वार्षिक 3 लाखांपर्यंत विमा सुविधा मिळेल. आगाऊ रक्कम भरल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यास बिलाच्या रकमेवर दावा करता येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील एकूण 1020 रुग्णालये आणि जिल्ह्यातील 38 रुग्णालयांमध्ये उपचार मिळू शकतात. पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आरोग्य विमा कंपनीच्या प्रतिनिधी श्रीकांत गुणारी यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरनाथ कडबुर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजय डूम्मगोळ व महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *