Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

बिजगर्णी गावातील रोजगार हमी महिलांचा श्री कलमेश्वर मंदिरासाठी स्तुत्य उपक्रम

  बेळगाव : बिजगर्णी येथील श्री कलमेश्वर मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावातील रोजगार योजनेच्या महिला वर्ग व गावातील ट्रॅक्टर ट्रॉली धारकांनी एकत्रितपणे येऊन श्रमदानातून गावच्या बाहेरील टेकडीवरील माती आणून मंदिराचे सपाटीकरण करण्यात आले. गावची मंदिरं ही श्रद्धास्थाने असतात. गावच्या एकीतूनच असे सार्वजनिक कार्य घडू शकते श्री …

Read More »

श्री जयतीर्थ वृंदावनाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : मेळखेड (जि. कलबुर्गी) येथील उत्तराधिकारी मठाच्या श्री जयतीर्थ वृंदावनाबद्दल श्रीरायर मठाच्या अनुयायांकडून समाजात गैरसमज पसरवण्याद्वारे लोकांना भडकवण्याचा जो प्रकार केला जात आहे त्याला तात्काळ आळा घालावा, अशी मागणी विश्वपद्म महापरिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. विश्वपद्म महापरिषदेच्या बेळगाव येथील पदाधिकारी आणि सदस्यांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन …

Read More »

विजेचा धक्का लागून हत्तीचा बळी

  म्हैसूर येथील धक्कादायक घटना म्हैसूर : नागरहोळ राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत कर्नाटक-केरळ सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावर अन्नाच्या शोधात जंगलातून नदीकडे आलेल्या हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. म्हैसूर- मानंदवाडी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला आज पहाटे एक हत्ती कोसळलेल्या अवस्थेत आढळून आला असून, वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता हत्तीचा मृत्यू विजेच्या धक्क्याने …

Read More »

पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

  मुंबई : अखेर रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं विलंब …

Read More »

दोदवाड जुम्मा मस्जिद कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : दोदवाड (ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) गावातील ईदगाहसाठी असलेल्या 2 एकर जमिनीची नोंद सर्व्हेच्या 11 नंबर कॉलममधून काढून 9 नंबर कॉलममध्ये करावी अशी मागणी दोदवाडच्या जुम्मा मस्जिद कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दोदवाड येथील जुम्मा मस्जिद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या …

Read More »

बेकिनकेरे येथे शेतजमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; 10 जण जखमी

  बेळगाव : शेतजमिनीच्या वादातून बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथे गुरुवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी 50 जणांच्या टोळक्याने तलवारी, लाठ्या, काठ्यांनी मारहाण केल्याने दुसऱ्या गटातील 10 जण जखमी झाले. त्यामुळे गावात काहीवेळ तणावाचे वातावरण होते. केवळ मारहाणच नव्हे तर भात पेरणी केलेली शेती ट्रॅक्टरने नांगरली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात …

Read More »

अन्नभाग्य योजना उद्यापासून सुरू

  5 किलो तांदूळ ऐवजी पैसे वाटप ; मंत्री केएच मुनिअप्पा माहिती बंगळुरू : अन्नभाग्य योजना उद्यापासून राज्यभर सुरू होणार असल्याचे अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सांगितले. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री मुनियप्पा म्हणाले की, अन्नभाग्य योजना उद्यापासून सुरू होईल आणि अतिरिक्त 5 किलो तांदळाच्या बदल्यात 5 किलो मोफत तांदूळ दिला …

Read More »

जीवनविद्या मिशनतर्फे रविवारी गुरुपौर्णिमा

  बेळगाव : जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्र, बेळगावच्यावतीने रविवार दि. २ जुलै रोजी मराठा मंदिर येथे गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सद्गुरु वामनराव पै यांचे अनेक नामधारक एकत्र येणार आहेत. या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत संगीत जीवनविद्या, नृत्य, गुरुपूजन, प्रबोधन आणि श्री …

Read More »

केंद्रात शिंदेंच्या शिवसेनेला दोन मंत्रिपदं मिळणार!

  मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज एक वर्षं पूर्ण झालं. शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त काही मिळत नव्हता. अखेर मंत्रीमंडळाला मुहूर्त मिळाला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री उशिरा …

Read More »

अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात?

  बेळगाव : उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अशोक मण्णीकेरी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी मण्णीकेरी कुटुंबीयांनी केली असल्याचे समजते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अशोक मण्णीकेरी यांना पहाटे 3 वाजता …

Read More »