Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

मोदेकोप गावच्या पाणी समस्येची आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी घेतली दखल

  खानापूर (प्रतिनिधी) : मोदेकोप (ता. खानापूर) गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मोदेकोप गावच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या महिलाना व नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. मोदेकोप गावात केवळ एकाच कूपनलिकेवर संपूर्ण गावाला विसंबून राहावे लागत असल्याने केवळ कूपनलिके व्यतिरिक्त कोणते स्वच्छ पाणी मिळत नाही. असे …

Read More »

बेळगावात पावसासाठी मुस्लिम समुदायाची प्रार्थना

  बेळगाव : पाऊस लांबल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे सगळीकडे पावसासाठी प्रार्थना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मुस्लिम समुदायातर्फे पावसासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. बेळगाव येथील ईदगाह मैदानावर शनिवारी मुस्लिमांनी सामूहिक नमाज अदा केली. बेळगाव उत्तर काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामूहिक प्रार्थनेदरम्यान …

Read More »

उद्योजक शिंदेंच्या मृत्यूनंतर गडहिंग्लज बंद, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नागरिक संतप्त

  गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समुहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे (वय ४६) यांनी शुक्रवारी मध्यरात्री पत्नी तेजस्विनी (वय ३६) व मुलगा अर्जुन (वय १४) यांच्यासह जीवनयात्रा संपविली. आज (दि.२४) पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वपक्षीयांसह नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका …

Read More »

घटप्रभा नदीतील अनेक मासे मृत्युमुखी!

  बेळगाव : यावर्षी मान्सून लांबल्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच नद्या, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला पिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची झळ जलचर प्राण्यांना देखील बसली आहे. नदी, नाले कोरडे पडल्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदी …

Read More »

प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही : नलीन कुमार कटील यांचे घुमजाव

  बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे विधान आज सकाळी बेळ्ळारी येथे करणारे नलीन कुमार कटील यांनी अल्पावधीतच राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट करून घुमजाव केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी पत्रक जारी करताना म्हटले आहे की, माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून ही …

Read More »

नलिन कुमार कटील यांच्याकडून भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

  बंगळूर : दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी भाजपच्या कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी बल्लारी येथे पत्रकारांना संबोधित करताना, कटील म्हणाले की, मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे राजीनामा दिला आहे. “भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा माझा दोन वर्षांचा कार्यकाळ …

Read More »

दानशूरांमुळे कॅन्सरग्रस्त बालकावर यशस्वी उपचार

  बेळगाव : जनतेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे एका गरीब दुर्बल घटकातील 6 वर्षाच्या बालकाच्या कॅन्सर उपचारासाठी मदत झाली असून तो मुलगा हळूहळू बरा होत आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, गोकाक येथील 6 वर्षीय भर्माप्पा गौडा या बालकाला कॅन्सरने (ॲक्युट लिंफोब्लास्टिक लुकेमिया) ग्रासले होते. मात्र घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने …

Read More »

बेळगाव शहरासह विविध उपनगरांतील आणि काही गावांचा उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी (ता. 25 जून) विविध उपनगरांसह काही गावांचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळरोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाउंड, सर्वोदय कॉलनी, नाझर …

Read More »

मुलांच्या भवितव्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची

  आशिषभाई शाह; देवचंद महाविद्यालयात सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : शालेय जीवनात कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट मार्गदर्शन असेल तरच पुढील खडतर प्रवास सुखकर होईल. यामध्ये पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. या पंचक्रोशीतील शाळांचे देवचंद महाविद्यालयांशी असलेले ऋणानुबंध आजही अखंडीत आहेत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाविद्यालय व आपण नेहमीच कटिबद्ध …

Read More »

महिलांना बस प्रवास करत आहात मग सावधान; पोलिसांचे आवाहन

  बेळगाव : राज्य सरकारने महिलांसाठी शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास सुरू केला आहे. सर्वच बसमध्ये महिलांची झुंबड उडत आहे.गर्दीचा फायदा घेत महिलांच्या सोन्या चांदीचे दागिने, पैसे पळवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बेळगाव शहर पोलिसांनी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना चोरांपासून सावधानता बाळगावी असे आवाहन प्रत्येक बस मध्ये जाऊन करत …

Read More »