Sunday , September 20 2026
Breaking News

प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही : नलीन कुमार कटील यांचे घुमजाव

Spread the love

 

बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे विधान आज सकाळी बेळ्ळारी येथे करणारे नलीन कुमार कटील यांनी अल्पावधीतच राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट करून घुमजाव केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी पत्रक जारी करताना म्हटले आहे की, माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून ही बातमी तयार करण्यात आली आहे. मी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. निवडणुकीतील पराभवाला आपण नैतिकदृष्ट्या जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पराभवाची कारणे मी पक्षातील ज्येष्ठांना सांगितली. गेली चार वर्षे मी अध्यक्ष आहे. प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीबाबत पक्ष निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *