Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर स्मार्ट शहर बनवणार; आम. डाॅ. अंजली निंबाळकर

  खानापूर : अद्यावत सरकारी हॉस्पिटल आणि हायटेक बस स्थानकामुळे खानापूर शहराच्या वैभवत भर पडली आहे. 24 तास पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार अशा पायाभूत विकासासाठी प्रयत्न केले आहेत. यापुढेही खानापूरला बेळगावच्या धरतीवर स्मार्ट बनण्यासाठी नियोजन तयार करण्यात आले आहे. त्यासाठी जनतेने पुन्हा एकदा मला संधी द्यावी असे आवाहन आमदार डॉक्टर …

Read More »

रमाकांत कोंडुसकर यांची आजची पदयात्रा भाग्यनगरात

  बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. 3 मे रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ अनगोळ नाका येथून चिदंबर नगर येथून भाग्यनगरमधील सर्व क्रास फिरून सांगता होईल. पदयात्रेत या भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला …

Read More »

अनाथ वृद्ध महिलेवर समाजसेविका माधुरी जाधव यांनी केले अंत्यसंस्कार

  बेळगाव : जगी ज्यास कोणी नाही, त्याच्यासाठी देव (परमेश्वर) आहे असे मानले जाते. अर्थात परमेश्वराच्या कृपेनेच काही व्यक्तींनी समाजाप्रती असलेल्या सदभावनेतून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. कोणतीही सार्वजनिक आपत्ती असो किंवा वृद्ध आणि अनाथ व्यक्तींवरील अंत्यसंस्कार जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन या कार्यात नेहमीच त्यांचा पुढाकार …

Read More »

बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रचार सभा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या जाहीर प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर येत असून बुधवार दि. ३ मे रोजी त्यांच्या सीमा भागात दोन प्रचार सभा होणार आहेत. कारभार गल्ली वडगाव आणि संयुक्त महाराष्ट्र चौकात या सभा होणार आहेत. दक्षिण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत …

Read More »

मराठी भाषिकांचे खच्चीकरण खपवून घेतली जाणार नाही : रोहीत पाटील

जांबोटी येथील प्रचार सभेत इशारा खानापूर : गेल्या ६८ वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार होत आहे. तरीही मराठी भाषिकांनी आपल्या मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते मराठी भाषिकांचे खच्चीकरण करीत आले आहेत. पण, यापुढे त्यांची दंडेलशाही सहन केली जाणार नाही, जशास …

Read More »

विजयनगर, विनायक नगर भागामध्ये ऍड. अमर येळूरकर यांच्या विजयाचा निर्धार

  बेळगाव : दिनांक 2 मे रोजी सकाळी बेळगाव उत्तर मतदारसंघातील विजयनगर, विनायक नगर, बुडा स्किन नंबर 51  या भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. श्री. अमर येळूरकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली. मराठी बहुलभाग असणाऱ्या या भागातून नागरिकांनी अमर येळूरकर यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला भागातील अनेक घरांमध्ये येळूरकर यांचे …

Read More »

विकासाभिमुख कामांचे फळ नक्कीच मिळणार : डॉ. अंजली निंबाळकर

  खानापूर : सर्वसामान्यांचा वाढता पाठिंबा विकासाभिमुख कामांचे फळ आहे. विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. पूर्व भागासह तालुक्याच्या परिवर्तनासाठी केलेल्या कार्याच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे. पाच वर्षाचे विकासाचे पर्व अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसच्या हाताला साथ द्या, असे आवाहन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. पूर्व …

Read More »

डॉ. अंजली निंबाळकर यांचा खानापुरात भव्य रोड शो; मतदारांचा अभूतपूर्व पाठिंबा

  खानापूर : तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेस आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरात भव्य रोड शो करून घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी मतदारांचा त्यांना अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व महिला सक्षमीकरणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरात भव्य रोड शो करून घरोघरी प्रचार …

Read More »

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन

  कोल्हापूर- महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे अल्पशा आजाराने आज (दि.२) कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. कोल्हापुरात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पुत्र तुषार गांधी यांच्या संमतीने वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड) येथील गांधी फौंउडेशनच्या जागेत सायंकाळी ०५ ते ६:३० या …

Read More »

राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा समितीचे मावळे व्हा : माजी आमदार मनोहर किणेकर

  हिंडलगा : राष्ट्रीय पक्षाचे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन कावळे होण्यापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे मावळे व्हा, असा सल्ला माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला. काल म ए समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांच्या हिंडलगा परिसरात झालेल्या प्रचार पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. मराठीच्या अस्तित्वासाठी येत्या दहा मे रोजी …

Read More »