Wednesday , April 22 2026
Breaking News

बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रचार सभा

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या जाहीर प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर येत असून बुधवार दि. ३ मे रोजी त्यांच्या सीमा भागात दोन प्रचार सभा होणार आहेत.

कारभार गल्ली वडगाव आणि संयुक्त महाराष्ट्र चौकात या सभा होणार आहेत. दक्षिण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारासाठी ते बेळगाव दौऱ्यावर येणार असून बुधवार दि. ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कारभार गल्ली येथे त्यांची कोपरा सभा आयोजित केली आहे.

बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील जनतेच्या भावना, येथील जनतेच्या समस्या यासह सीमाप्रश्नी त्यांनी रोखठोख भूमिका घेत सातत्याने संसदेत आवाज उठविला आहे. सीमावासियांच्या बाजू उचलून धरत नेहमीच विरोधकांवर आग्रही टीकाटिप्पणी करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याबद्दल सीमावासीयांना आपुलकी आहे. त्यांचा बेळगाव दौरा निश्चित झाल्याने दक्षिण विधानसभा मतदार संघासह संपूर्ण सीमाभागात उत्साहाचे वातावरण पसरले असून या सभेला मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुचाकी रॅली

वडगाव येथील जाहीर सभेनंतर खासदार संजय राऊत आणि रमाकांत कोंडुसकर हे दुचाकी रॅलीने रात्री 8 वाजता होणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र चौकातील संयुक्त जाहीर सभेत सहभागी होणार आहेत.

‘असा’ आहे खास. संजय राऊत यांचा बेळगाव दौरा

दक्षिण विधानसभा मतदार संघाचे समिती उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारासाठी बुधवार दि. ३ मे २०२३ रोजी महाराष्ट्राचे शिवसेना नेते खास. संजय राऊत हे बेळगावमध्ये येणार आहेत.

उद्या दुपारी २.३० वाजता त्यांचे सांबरा विमानतळावर आगमन होणार असून दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.०० यावेळेत त्यांच्या खाजगी स्वरूपाच्या कामकाजात ते व्यस्त असणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ यावेळेत खानापूर समितीच्या संपर्क कार्यालयात धावती भेट देणार आहेत.

सायंकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत कारभार गल्ली, वडगाव येथे दक्षिण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजिण्यात आली असून रात्री ८.०० ते १०.०० यावेळेत संयुक्त महाराष्ट्र चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती दौरा समन्वयक विकास कलघटगी आणि यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *