Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

मराठी विद्यानिकेतन बालमंदिर विभागाकडून आई, पालकांसाठी आरोग्य चर्चा सत्राचे आयोजन

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव बालमंदिर विभागातील अंकुर व शिशु वर्गाच्या आई, पालकांसाठी महिला दिनानिमित्त डॉ. गायत्री येल्लापूरकर यांचे आरोग्य विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.जी.व्ही. सावंत सर म्हणाले, महिलांना दररोजच्या कामातून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो स्त्री जरी यशाच्या शिखरावर …

Read More »

राजहंसगडावरील दुग्धाभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करणार; येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्णय

  येळ्ळूर : येत्या 19 मार्च रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येळ्ळूर राजहंसगड येथे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक सोहळा साजरा करण्याचा निश्चय केला आहे. सदर दुग्धाभिषेक सोहळ्यात प्रामुख्याने सहभागी होऊन मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. शांताराम …

Read More »

संभाजीनगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत डॉन फायटर विजेता

  निपाणी (वार्ता) : येथील देवचंद महाविद्यालयात शेजारील न्यू संभाजीनगरमध्ये प्रीमियर लीग हाफपिच नाईट क्रिकेट स्पर्धा 2023 मधील सीजन-2 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉन फायटर संघाने विजेतेपद पटकवले. या स्पर्धेत वेद फायटर्स संघ, ब्ल्यू आर्मी संघ यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान …

Read More »

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे संसदेत पडसाद, राजनाथ सिंह यांची सडकून टीका

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, कुणीही देशाबाहेर जाऊन देशाचा अपमान करु नये. खासदाराला असं वर्तन शोभत नाही, असं राजनाथ …

Read More »

बिजगर्णी ग्रामस्थ कमिटीचा झेंडा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे

  बेळगाव : बिजगर्णी ग्रामस्थ कमिटीच्या अध्यक्ष पदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वसंत अष्टेकर, सेक्रेटरी विष्णू मोरे तर खजिनदार पदी कल्लाप्पा अष्टेकर यांची बिन विरोध एकमताने‎ निवड करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे गावच्या प्रत्येक नागरिकांना प्रतीष्ठीचा विषय होता. गेल्या एक वर्षा पासून या निवडणुकीसाठी संपूर्ण गाव राजकारणात धगधगत होते. गावचा …

Read More »

‘नाटू नाटू’ चा ऑस्‍करमध्ये डंका, ठरले सर्वोत्‍कृष्‍ट गाणे

  नवी दिल्ली : भारतीय प्रेक्षकांना आज सकाळी सुखद धक्‍का मिळाला आहे. लोकप्रीय आरआरआर चित्रपटाने आज इतिहास रचला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार मिळाला. यामुळे पुन्हा एकदा भारतीय चित्रपटाने जगभर आपला डंका वाजवला आहे. यावर्षी दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या …

Read More »

उत्तम पाटील नावाच्या वादळात सर्व नेतेमंडळी उडून जातील

  प्राध्यापक सुभाष जोशी : कोनोळीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी कोगनोळी : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून केलेली विकास कामे कौतुकास्पद आहेत. 2000 साली आमदारकीच्या निवडणुकीत सोळाशे मतदान झाले होते. या ठिकाणी विरोध आहे. कोगनोळी येथे दबाव टाकून देखील इतक्या मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या हे कौतुकास्पद आहे. …

Read More »

देवलत्ती येथे डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार

  खानापूर : देवलत्ती (ता. खानापूर) येथील वीज समस्या निकाली लावण्यात भाजप ग्रामीण महिला उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी यश मिळवले. यानिमित्त देवलत्तीवासीयांनी त्यांचा नागरी सत्कार केला. डॉ. सरनोबत त्यांनी गावातील समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांनी प्रशंसा केली. डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या, गावातील कोणत्याही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत आयोजित होळीला महिलांची उत्स्फूर्त दाद

    खानापूर : भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत तसेच देसी गर्ल्सतर्फे खानापूर येथे जल्लोषात होळी साजरी करण्यात आली. यावेळी हजारो युवती, महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रेन डान्स, पारंपरिक नृत्य, डीजे, अन्नोत्सव या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. डॉ. सोनाली सरनोबत यांनी उपस्थित महिला, युवतींसह नृत्याचा आनंद लुटला. …

Read More »

राजहंसगडावरील छ. शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी नियोजन कमिटीची स्थापना

  बेळगाव : दिनांक 19/03/2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक रंगुबाई पॅलेस येथे संपन्न झाली व यावेळी कार्यक्रम नियोजन कमिटी ठरविण्यात आली. महाप्रसादाच्या नियोजनाची जबाबदारी येळ्ळूर- येळ्ळूर विभाग समिती व परिसरातील गावावर सोपविण्यात आली असून देणगी व साहित्य …

Read More »