नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, कुणीही देशाबाहेर जाऊन देशाचा अपमान करु नये. खासदाराला असं वर्तन शोभत नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. या मुद्द्यावरुन संसदेत सत्ताधारी भाजप खासदार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गदारोळ
संसदेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, सभागृहातील सदस्य राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताचा अपमान केला. त्यांच्या वक्तव्याचा सभागृहातील सर्व सदस्यांनी निषेध करावा, अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली. तर राज्यसभेतील सभागृहात पियुष गोयल यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
Belgaum Varta Belgaum Varta