Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतन बालमंदिर विभागाकडून आई, पालकांसाठी आरोग्य चर्चा सत्राचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव बालमंदिर विभागातील अंकुर व शिशु वर्गाच्या आई, पालकांसाठी महिला दिनानिमित्त डॉ. गायत्री येल्लापूरकर यांचे आरोग्य विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.जी.व्ही. सावंत सर म्हणाले, महिलांना दररोजच्या कामातून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो स्त्री जरी यशाच्या शिखरावर पोचली तरी स्वतःच्या आरोग्याला दुय्यमच लेखते पण असे न करता स्वतःच्या शरीराला ओळखावे हाच कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व वक्त्या डॉक्टर गायत्री यल्लापूरकर उपस्थित होत्या मोरेश्वर आयुर्वेद आरोग्य योजनेअंतर्गत या आरोग्य क्षेत्रात चर्चासत्राचे आयोजन झाले.

आयुर्वेदातील तज्ञ गायत्रीताई बोलताना म्हणाल्या की, आयु म्हणजे आयुष्य तर वेद म्हणजे जाणणे. स्वतःची प्रकृती आपण ओळखून त्याप्रमाणे आहार, विहार व व्यायाम केल्यास काळजी घेतल्यास आपण निरोगी आयुष्य जगू शकतो अशा प्रकारे आयुर्वेदाचा अर्थ त्यांनी सांगितला व प्रकृती चाचणीद्वारे प्रकृतीनुसार त्यावर उपाययोजना करण्यासाठी गायत्रीताईंनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.जी.व्ही. सावंत सर, शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्य.मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, बाल मंदिर विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, स्वाती जाधव, रेणू सुळकर, अश्विनी हलगेकर, भारती हनगोजी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालमंदिर विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर यांनी केले. आभार जयश्री पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *