Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग : ‘महावितरण’चा खेडूत स्पोर्ट्सला ‘शॉक’……! थरारक अंतिम सामन्यात १५ धावांनी मात

  कांबळे, दळवी, तुपारे ठरले उत्कृष्ट खेळाडू तेऊरवाडी : चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित “पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३” स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महावितरण टीमने खेडूत स्पोर्ट्स ला शॉक देत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना महावितरणने ८ षटकात केलेल्या ४ बाद ९० धावांचा …

Read More »

कोनराड संगमा दुसर्‍यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; दोन उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली शपथ

  कोनराड संगमा यांनी दुसर्‍यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. मेघालय विधानसभा निवडणूक 2023 साठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. 2 मार्च रोजी त्रिपुरा आणि नागालँडसह राज्य निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. कोनराड संगमा यांच्या …

Read More »

कॉर्पोरेट जगतानेही गुंतवणूक वाढवावी, पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कॉर्पोरेट विश्वाला गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, कॉर्पोरेट जगताने गुंतवणूक वाढवावी आणि अर्थसंकल्प 2023-24 मध्ये दिलेल्या संधींचा लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (7 मार्च) ’आर्थिक क्षेत्र’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केलं. मोदी म्हणाले की, सरकारने …

Read More »

आरएसएस आणि मुस्लीम ब्रदरहूड सारखेच कारण राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे फुटलं नव्या वादाला तोंड

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथून ते विविध वक्तव्यं करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आहेत कारण त्यांचं नवं वक्तव्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि …

Read More »

’राहुल गांधी मुलं जन्माला घालू शकत नाहीत’; कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष कटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

  बेंगळुरू : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा खासदार नलिन कुमार यांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद निर्माण केलाय. एका कार्यक्रमात ते म्हणाले, ’राहुल गांधी लग्न करत नाहीत. कारण, त्यांना मुलं निर्माण करता येत नाहीत.’ त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नलिन यांनी हे पहिल्यांदाच …

Read More »

वाईट सवयींचा त्याग करत विद्यार्थ्यांचे अनोखे होळी दहन

‘अंकुरम’ शाळेतील अनोखा उपक्रम; चांगल्या सवयींच्या संकल्प निपाणी (वार्ता) : ‘मी रोज उशिरा उठतो, आई-वडिलांचे ऐकत नाही, नीट जेवण करत नाही, वेळेवर गृहपाठ करत नाही, मला लवकर राग येतो’, अशा अनेक प्रकारच्या दोष आणि वाईट सवयींचा त्याग करत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने होलिका दहन केले. येथील कोडणी रस्त्यावरील ‘अंकुरम’ इंग्लिश मिडियम …

Read More »

गुंजेनहट्टी होळी-कामाण्णा यात्रोत्सव उद्या मंगळवारपासून

  गुंजेनहट्टी : बेळगावसह संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव तालुक्यातील गुंजेनहट्टी येथील मंगळवार दि 7 मार्चपासून सुरू होत असलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रो उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना निर्बंधानंतर आता निर्बंध मुक्त यात्रा साजरी होत आहे. यात्रेतील वाढती …

Read More »

प्रभावती फाउंडेशनतर्फे उद्या “रंग बरसे” कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांच्या प्रभावती फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी बीएससी मॉलच्या बाजूला असलेल्या शुक्रवार पेठ येथील खुल्या जागेत होळी निमित्त “रंग बरसे” हा महिलांसाठी रंगोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सकाळी आठ ते दुपारी दोन यावेळेत …

Read More »

निपाणीत पर्यावरणपूरक होळी

विविध मंडळाकडून कचरा संकलन : दृष्ट प्रवृत्तीच्या प्रतिकृतीचे दहन निपाणी (वार्ता) : कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षापासून शहरासह उपनगरात होळीचा आनंद कमी झाला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षानंतर सोमवारी (ता.६) सायंकाळी शहरात विविध ठिकाणी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कचरा संकलन करून होळी पौर्णिमा साजरी झाली. चौकाचौकासह घरासमोर होळ्या …

Read More »

उचगाव मळेकरणी देवी वार्षिकोत्सवाला उद्यापासून सुरुवात

  बेळगाव : उचगाव येथील श्री मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताहाला मंगळवार दि. ६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. सदर वार्षिकोत्सव सालाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने पार पाडण्यात येणार असून सकाळी ६.३० वाजता महाआरती नंतर संपूर्ण गावात देवीची सवाद्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. सप्ताह काळात श्री मळेकरणी परिसरात होणाऱ्या यात्रा स्थगित …

Read More »