Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीत पर्यावरणपूरक होळी

Spread the love
विविध मंडळाकडून कचरा संकलन : दृष्ट प्रवृत्तीच्या प्रतिकृतीचे दहन
निपाणी (वार्ता) : कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षापासून शहरासह उपनगरात होळीचा आनंद कमी झाला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षानंतर सोमवारी (ता.६) सायंकाळी शहरात विविध ठिकाणी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कचरा संकलन करून होळी पौर्णिमा साजरी झाली. चौकाचौकासह घरासमोर होळ्या पेटवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.
साखरवाडीतील युवक मंडळाने हनुमान मंदिरासमोर  पोळी दानचा उपक्रम राबवला. यावेळी
शिवाजी साळुंखे  सचिन पोवार, ओंकार लोहार, अनिल पारळे, करण साळुंखे, सुरेश बोरगावे, शिवाजी साळुंखे, राजू निकम, अतुल चावरेकर, शिरीष कमते, अण्णासाहेब साळुंखे, धनाजी लोहार, धीरज  इंदलकर, नितीन हजारे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
महादेव गल्ली महादेव मंदिर जवळ माजी उपनगराध्यक्ष सुनील  पाटील यांच्या हस्ते होळी पूजा करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, संजय मोळवडे, रवींद्र कोठीवाले, समीर बागेवाडी, महेश दुमाले, बाळू जाधव, शिवानंद चंद्रकुडे, बाबासाहेब साजन्नावर, बाळकृष्ण वसेदार,शिवकांत चंद्रकुडे, विजय दुमाले, विजय चंद्रकुडे, प्रकाश पणदे,  यांच्या सह गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
साखरवाडीतील हौसाबाई कॉलनी परिसरातील युवकांनी  सायंकाळी परिसराची स्वच्छता करून कचऱ्याची होळी केली.  यावेळी उमा आवळेकर, सरस्वती नावलगी, माया जाधव, रूपाली जाधव व परिसरातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते होळीची पूजा झाली. यावेळी गणेश माने, अशोक राऊत, विक्रम जाधव, हर्षवर्धन जाधव, श्रवण जाधव, उत्तम लोहार, रोहन राऊत यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
प्रगती नगरातील प्रगतीनगर मित्र मंडळातर्फे आयोजित होळीचे पूजन चंद्रकांत हिरेमठ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रवीण येजरे, बाबुराव मलाबादे, बाळासाहेब शेडगे, विनोद साळुंखे, अवधूत शेडगे, अमित बल्लारी, प्रथमेश शेडगे, देवेंद्र खोत, आशिष सांगावकर, निलेश पठाडे, विवेक पाटील, विवेक सूर्यवंशी, विकी बल्लारी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
बसवाननगरातील शिवप्रेमी बाल व युवक मंडळातर्फे होळीमध्ये दृष्ट प्रवृतीच्या प्रतिकृतीचे दहन केले. यावेळी विघ्नेश बल्लोळे, प्रथमेश लोहार, साई वाघे, आदित्य लोहार, मयुरेश आवळेकर, निखिल चौगुले, मयुर खोत, साई बागे, सिद्धार्थ जाधव, विराज आवळेकर, उन्मेश काटकर, प्रसन्न देवडकर, प्रज्वल कस्तुरे, सुजल बाबर यांच्यासह कायर्कते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *