Saturday , November 7 2026
Breaking News

गुंजेनहट्टी होळी-कामाण्णा यात्रोत्सव उद्या मंगळवारपासून

Spread the love

 

गुंजेनहट्टी : बेळगावसह संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव तालुक्यातील गुंजेनहट्टी येथील मंगळवार दि 7 मार्चपासून सुरू होत असलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रो उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना निर्बंधानंतर आता निर्बंध मुक्त यात्रा साजरी होत आहे. यात्रेतील वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहनांची पार्किंग व्यवस्था कडोली आणि देवगिरी येथे करण्यात आली आहे. यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
सालाबाद प्रमाणे धुलीवंदना निमित्त गुंजेनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री होळी कामाण्णा देवाची यात्रा यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे, बेळगावसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून लाखो भाविक येऊन आपले नवस फेडतात. गेली दोन वर्षे कोरोना काळामुळे यात्रेवर निर्बंध आले होते. यावर्षी निर्बंध मुक्त यात्रा साजरी होणार असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा अंदाज देवस्थान यात्रा कमिटीने व्यक्त केला आहे.
यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे, मंदिरापासून चोहोबाजूनी एक किलोमीटरचे अंतर भाविकांनी व्यापलेले असते शिवाय मंदिर परिसरातील रस्तेही भाविकांनी फुलून गेलेले असतात, तेव्हा या ठिकाणी मंदिर परिसरात वाहने आत येऊन भाविकांना त्रास होऊ नये यासाठी कडोली आणि देवगिरी गावाजवळ वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, मंदिर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, शिवाय यात्रेवर सी सी टीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे, यात्रा काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत पुरवठा मंडळांने खास यात्रेसाठी आणखी एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे, होळी कामाण्णा मंदिरासमोर एक भव्य शामियाना उभारण्यात आला असून मंदिर ही विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे, यात्रा दिवसा पार पाडावी या उद्देशाने देवस्थान पंचकमिटीने सकाळी लवकर श्री होळी कामांना मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे निश्चित केले असून उद्या सकाळी ठीक 9-00 वाजता भर यात्रेला सुरुवात होणार आहे. तेव्हा यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी सहकार्य करावे असे आव्हान देवस्थान पंच कमिटीने केले आहे. शिवाय ज्या ठिकाणी भाविक राहतात त्या ठिकाणीच नैवेद्य दाखवून पूजा करावी. नैवेद्य मंदिराकडे आणू नये असे आवाहन देवस्थान व पंचकमिटीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *