Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण उद्या

  आमदार लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी होण्याबाबतची उत्सुकता कायम! बेळगाव : राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अनावरणाचा शासकीय कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खाते तसेच कर्नाटक रस्ते सुधारणा मंडळाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. 2) सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते …

Read More »

मणगुत्ती शास्त्री विद्यालयात मराठी भाषा दिन

  बेळगाव : मणगुत्ती ( ता. हुक्केरी) येथील द. म. शि. मंडळ संचलित लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. के. स्वामी होते. प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी हसनेकर म्हणाले, आपण आपल्या …

Read More »

निल इंडियन बॉईज हिंडलगा किरण जाधव चषकाचा मानकरी

  येळ्ळूर : श्री चांगळेश्र्वरी स्पोर्ट्स येळ्ळूर यांच्या वतीने श्री चांगळेश्र्वरी हायस्कूल मैदानावर आयोजित केलेल्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत निल इंडियन बॉईज हिंडलगा संघाने एकदंत स्पोर्ट्स कणबर्गी संघाचा 5 गड्यांनी पराभव करून श्री. किरण जाधव चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत एकूण 38 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या बक्षीस …

Read More »

गवि रेड्यांचा देसूरमध्ये संचार

बेळगाव : बेळगाव तालुक्यात वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीत शिरकाव होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. येळ्ळूर येथे नागरी वस्तीत हरीण शिरल्याची घटना ताजी असतानाच देसूर येथे गवि रेड्यांनी गावात शिरून ग्रामस्थांना धडकी भरविल्याची घटना घडली. मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा शिरकाव होत असल्याच्या घटनांत बेळगाव तालुक्यात वाढ होताना दिसत आहे. येळ्ळूर गावात वाट …

Read More »

बेळगावचे माजी पोलिस कमिश्नर भास्कर राव यांचा “आप”ला रामराम; भाजप प्रवेश

  बेंगळुरू : कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसला आहे. बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते भास्कर राव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भास्कर राव यांनी आज 1 मार्च रोजी भाजपचं सदस्यत्व घेतलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची बेळगावच्या शिष्टमंडळाशी चर्चा

  बेळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. मुंबई येथील आझाद मैदानावर मंगळवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर समिती शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली पुढील वाटचालीसाठी चर्चा केली. यावेळी समिती नेते …

Read More »

कर्नाटक सरकारी नोकर वर्गाच्या संपाला खानापूरातून एकमुखी पाठींबा

  खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी नोकर वर्गाला सातवा वेतन लागू करा, जुनी पेन्शन लागु करा या मागणीसाठी नोकर संघाच्या वतीने बुधवारच्या संपाला खानापूर तालुक्यातून एकमुखी पाठींबा दिसुन आला. कर्नाटक राज्य नोकर संघ खानापूर तालुका घटक यांच्या वतीने बुधवार दि. १ मार्च रोजी खानापूरात सरकारी नोकर संघाच्या संपाला पाठींबा देत सरकारने …

Read More »

मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे माणूस प्रगल्भ होतो : युवराज पाटील

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने मराठी भाषा दिनाचे आयोजन येळळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने सोमवार( ता. 27) फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता श्री शिवाजी विद्यालयाच्या हॉलमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक व कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औवचित साधून मराठी भाषा दिनाचे …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी बैठकीत विविध विषयांवर चर्चा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला नगराध्यक्ष नारायण मयेकर, स्थायी कमिटी चेअरमन विनोद पाटील, उपस्थित होते. यावेळी बैठकीला चीफ ऑफिस आर. के. वटार, नगरसेवक माजी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, नगरसेवक आप्पया कोडोळी, हणमंत पुजार, नगरसेविका मिनाक्षी बैलूरकर, राजश्री …

Read More »

खानापूरात सरकारी नोकर वर्गाला सातवा वेतन लागू करा, जुनी पेन्शन लागु करा

  नोकर संघाच्या वतीने आजपासून संप खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य नोकर संघ खानापूर तालुका घटक यांच्या वतीने १ मार्च पासून राज्यात सरकारी नोकर संघाच्या संपाला पाठींबा देत सरकारने सरकारी कर्मचारी वर्गाला सातवा वेतन व २००६ पासूनच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन चालु करावी. या मागणीसाठी १ मार्च पासून संपावर जाणार असल्याची …

Read More »