Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूरात सरकारी नोकर वर्गाला सातवा वेतन लागू करा, जुनी पेन्शन लागु करा

Spread the love

 

नोकर संघाच्या वतीने आजपासून संप

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य नोकर संघ खानापूर तालुका घटक यांच्या वतीने १ मार्च पासून राज्यात सरकारी नोकर संघाच्या संपाला पाठींबा देत सरकारने सरकारी कर्मचारी वर्गाला सातवा वेतन व २००६ पासूनच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन चालु करावी. या मागणीसाठी १ मार्च पासून संपावर जाणार असल्याची माहिती मंगळवारी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य नोकर संघाचे खानापूर तालुका घटकाचे अध्यक्ष बी. एम. येळ्ळूर होते. तर बैठकीला संघाचे गौरवाध्यक्ष के. आर. कोलकार, खजिनदार जे. पी. पाटील, टी. आर. पत्री, शिवानंद औरदी, रमेश कवळेकर एन पी एस नोकर संघ तालुका अध्यक्ष तसेच एल. बी. जमादार, विनायक खन्नूकर, सुरेश गडाद, एम. एस. पुजार, सादिक पाश्चापूरे, शोभा सौदत्ती, गोविंद बोबाडी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष बी. एम. येळ्ळूर म्हणाले की, राज्य सरकारने सातवा वेतन व जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी सरकारी नोकरवर्ग राज्य भर बुधवारी दि. १ मार्च पासून संपावर जात आहे.
या संपावर जाताना आम्ही शांततेत आपल्या मागणीसाठी संप पुकारला आहे. कुठे ही अनुचित प्रकार होणार नाही. घोषणा बाजी करणार नाही. शाळा काॅलेज अथवा कार्यालयात कामावर हजर राहणार नाही. केवळ आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना दंडाला काळी फित बांधुन सेवेत राहणार आहेत.
खानापूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी वर्गाने या संपाला पाठींबा व्यक्त करून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *