Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन!

  बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले. यानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहून गावात फेरी काढण्यात आली. बेळगावसह सीमाभाग हा तत्कालीन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आल्यानंतर बेळगावात त्या विरोधात पहिले मोठे आंदोलन झाले. या आंदोलनावेळी 17 जानेवारी 1956 रोजी चार आणि दुसऱ्या दिवशी …

Read More »

जे. पी. नड्डांचा कार्यकाळ वाढवला; भाजपा कार्यकारिणीचा निर्णय

  नवी दिल्ली : जे. पी. नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काळ वाढवण्यात आला आहे. जून २०२४ पर्यंत जे. पी. नड्डाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा काही वेळापूर्वीच केली. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जे. पी. नड्डा …

Read More »

भाई डॉ. एन. डी. पाटील यांचा स्मृतिदिन गांभीर्याने

  बेळगाव : सीमातपस्वी सीमावासियांचे आधारवड भाई डॉ. एन. डी. पाटील यांचा पहिला स्मृतिदिन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात करण्यात आला. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी भाई एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी माजी …

Read More »

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन!

  बेळगाव : जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सीमालढा अखंडपणे चालूच राहील. हा स्वाभिमान आम्हाला कोणी शिकवलेला नाही. हा स्वाभिमान, ऊर्जा आमच्यात नैसर्गिकपणे आलेली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता टिकविण्यासाठी आमच्या हक्काच्या भूमीत जाण्यासाठी हा लढा आम्ही असाच चालू ठेवू, असा इशारा मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिला आहे. भाषावार …

Read More »

जिल्हा प्रवेश बंदी, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची बाब : खास. धैर्यशील माने

  बेळगाव : देशातील प्रत्येक नागरिकाला घटनेने संवैधानिक अधिकार दिले आहेत. मी सुद्धा या देशातील केंद्राचा एक लोकप्रतिनिधी आहे. मात्र संविधानिक अधिकार पायदळी तुडवत कर्नाटक सरकार मराठी माणसाची गळचेपी करत आहे. आज बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या हुतात्मा दिन कार्यक्रमाला जाण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली, यावरून कायदा सुव्यवस्थेच्या नावावर कर्नाटक …

Read More »

चोरीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी फॅब्रिकेटरला अच्छे दिन

  संरक्षण सेफ्टी दरवाजे करून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ कोगनोळी : येथे आठ दिवसापूर्वी पडलेल्या जबरी दरोडेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या दृष्टीने लोखंडी संरक्षण सेफ्टी दरवाजे करून घेण्यासाठी नागरिक फॅब्रिकेटर व्यवसायिकाकडे धाव घेत आहेत. काही नागरिकांनी ऑर्डर दिली आहेत. सुरक्षितेच्या दृष्टीने नागरिक हे पुढचे पाऊल टाकत आहे. शनिवार तारीख 7 जानेवारी रोजी येथील …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतचे पिडिओ अरुण नाईक यांच्या विरोधात तक्रार

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतचे पिडिओ अरुण नाईक यांच्यासंदर्भात जिल्हा पंचायत सीईओ, तालुका पंचायत इओ व इडी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये येळ्ळूर ग्राम पंचायत विकास अधिकारी अरुण नाईक यांच्याबद्दल वेळेवर कार्यालयाला न येणे, अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्यांना मान सन्मान न देणे, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना विश्वासात न …

Read More »

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा अडकला ‘लग्नाच्‍या बेडीत’!

  कराची : पाकिस्‍तानमध्‍ये आश्रय घेतलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कराचीमधील एका पाकिस्तानी महिलेशी लग्‍न केले आहे. यासंदर्भातील माहिती दाऊद इब्राहिमच्या भाच्याने दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिलेल्या माहितीत डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने दिली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इंडिया …

Read More »

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात खानापूरात जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज 16 जानेवारी रोजी खानापूर शहरात पत्रके वाटून 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. तर संध्याकाळी निडगल व गर्लगुंजी येथे खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात आली. 17 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता …

Read More »

हुतात्मा दिनाच्या पूर्व संध्येला समिती नेत्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक

  बेळगाव : 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झालेल्या गोळीबारात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता शहर समितीच्या वतीने हुतात्मा चौकात अभिवादन केले जाणार आहे. दरम्यान हुतात्मा दिनाच्या पूर्व संध्येला समिती नेते मंडळीनी खडे बाजार पोलीस अधिकारी अधिकाऱ्यांशी हुतात्मा …

Read More »