Monday , September 21 2026
Breaking News

हुतात्मा दिनाच्या पूर्व संध्येला समिती नेत्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक

Spread the love

 

बेळगाव : 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झालेल्या गोळीबारात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता शहर समितीच्या वतीने हुतात्मा चौकात अभिवादन केले जाणार आहे.
दरम्यान हुतात्मा दिनाच्या पूर्व संध्येला समिती नेते मंडळीनी खडे बाजार पोलीस अधिकारी अधिकाऱ्यांशी हुतात्मा दिनाच्या आयोजन संदर्भात चर्चा केली.

सकाळी समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे पोलिसांनी समितीला हुतात्मा दिन कार्यक्रमाला लाऊड स्पीकरची परवानगी दिली रॅली काढली जाणार असून स्थानिक पातळीवर हा कार्यक्रम गांभीर्याने पाळला जाणार आहे.

यावेळी एसीपी चंद्रप्पा आणि पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी समिती नेत्यांसोबत चर्चा केली.

यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, विकास कलघटगी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *