Saturday , April 26 2025
Breaking News

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा अडकला ‘लग्नाच्‍या बेडीत’!

Spread the love

 

कराची : पाकिस्‍तानमध्‍ये आश्रय घेतलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कराचीमधील एका पाकिस्तानी महिलेशी लग्‍न केले आहे. यासंदर्भातील माहिती दाऊद इब्राहिमच्या भाच्याने दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिलेल्या माहितीत डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने दिली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इंडिया टूडे’ दिले आहे.

हसीना पारकरच्‍या मुलाची ‘एनआयए’ला माहिती
दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने ‘एनआयए’ दिलेल्‍या माहितीत सांगितले आहे की, दाऊद इब्राहिम याने दुसरे लग्न केले आहे. त्‍याने अद्याप पहिली पत्नी मेहजाबीन शेख हिला घटस्फोट दिलेला नाही. एनआयएने धडक कारवाई करत दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित लोकांना अटक केली होती. या प्रकरणी तपास यंत्रणेने न्यायालयात आरोपपत्रही सादर केले होते.
अली शाहने ‘एनआयए’ला सांगितले आहे की, दाऊद इब्राहिमने अद्याप त्याची पहिली पत्नी मेहजाबीन शेखला घटस्फोट दिलेला नाही. दाऊदचे दुसरे लग्न म्हणजे मेहजाबीनवरून तपास यंत्रणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न असू शकतो, असेही त्याने म्हटले आहे.
जुलै 2022 मध्ये दाऊद इब्राहिम याने पहिल्या पत्नीची दुबईमध्ये भेट घेतल्‍याची माहिती समोर आली होती.
मेहजाबीन शेख भारतातील दाऊदच्या नातेवाईकांशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क ठेवत असल्याचेही तपासात स्‍पष्‍ट झाले होते. हसीना पारकरचा मुलगा अली शाह याने अंडरवर्ल्ड डॉन आता कराचीमध्ये असल्याची माहितीही ‘एनआयए’ला दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पाकिस्तानला सर्वांत मोठा धक्का! भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती

Spread the love  नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सराकरने कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *