Sunday , July 26 2026
Breaking News

नीटची फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार

Spread the love

 

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ३ मे २०२६ रोजीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्यानंतर आता या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता नीटची फेरपरीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी होणार आहे. याबद्दलची माहिती एनटीएने दिली आहे. परीक्षेबद्दल अधिकची माहिती ‘एनटीए’च्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल अशी माहितीही देण्यात आली आहे.

पेपरफुटीच्या प्रकरणानंतर देशभरात गाजलेली ‘नीट’ परीक्षा रद्द करून आता ती पुन्हा घेण्याची तयारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पूर्ण केली आहे. २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारी ही फेरपरीक्षा आता २१ जून रोजी पार पडणार आहे. मंगळवारी एनटीएने नीट यूजीचा पेपर रद्द झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. २२ लाखांपेक्षा जास्त परीक्षार्थींना या निर्णयाचा फटका बसला होता. या परीक्षेची विद्यार्थी वर्षभर तयारी करत असतात. यंदा नीट यूजीचा पेपर ३ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. पेपरनंतर एक दोन दिवसांनंतर ‘गेस पेपर’चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या गेस पेपरमधील बहुतांश प्रश्न जसेच्या तसे नीट परीक्षेत आल्याने संशय बळावला होता. त्यानंतर एनटीएने याचा तपास करण्याचे आदेश दिले. तपासात परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने एनटीएने अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *