
निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाला पंधरा दिवसात प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एक संपर्क केंद्रासह इतर ठिकाणी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे व तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता भासू नये. कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. येत्या खरीप हंगामात सिंचनाच्या साधनांचा अधिक वापर करावा. पीएम-किसान, पीकविमा व आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनात कोठेही उणीव भासू देऊ नये. प्रमाणित बियाणे वेळेत उपलब्ध करा यासह विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते तहसीलदारासह इतर कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून काळाबाजार रोखावा. प्रत्येक विक्री केंद्रावर दरफलक लावणे बंधनकारक करावे. हवामानावर आधारित पीक पद्धती, ठिबक तुषार रसिंचन, एकात्मिक कीड व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेऊन मार्गदर्शन करावे. पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. कृषी विभागाच्या विविध योजना शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या शेती व्यवस्थापनाची माहिती देण्यात यावी. गतवर्षी कृषी केंद्रातर्फे सोयाबीन बियाण्यांचे वितरण केले होते. पण उगवण क्षमता कमी असल्याने बियाणे रद्द करून दुसऱ्या टप्प्यात प्रमाणात बियाणे देण्यात आले होते. यंदाच्या खरीप हंगामातउगवण क्षमता नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्यास कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती कृषी विभाग, जिल्हाधिकाऱ्यासह विविध अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे निपाणी शहराध्यक्ष सर्जेराव हेगडे, एकनाथ सादळकर, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, बाबुराव खोत, सूर्याजी पोटले, लक्ष्मण आबणे, धनाजी पोटले, सचिन पाटील, बी.एच. बोटे, श्रीपती माने, बाळासाहेब गारगोटे, गोपाळ माळी, बाळासाहेब पाटील, सागर पाटील, दादासाहेब चौगुले, मधुकर पाटील, प्रकाश आंबी, बाबासाहेब निगवे, प्रकाश घाटगे, बाळू सांगावे यांच्यासह ग्रामीण भागातील शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी आणिLS
Belgaum Varta Belgaum Varta