Friday , November 6 2026
Breaking News

प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशाने निधन

Spread the love

 

खानापूर : प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेसचे सक्रिय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशामुळे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे फोंडा आणि परिसरात शोककळा पसरली असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर हे दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांनी प्रवास रद्द करून बेळगावला भेट दिली होती. त्यानंतर बेळगावहून फोंडा (गोवा) येथे परतत असताना अनमोड घाट परिसरात ते लघुशंकेसाठी थांबले. यावेळी त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. मोबाईल उचलण्यासाठी त्यांनी झुडपात हात घातला असता विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला.

घटनेनंतर वाहनचालकाने त्यांना तातडीने धारबांदोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉ. भाटीकर हे गोव्यातील नामांकित फिजिओथेरपिस्ट म्हणून परिचित होते. त्यांनी अलीकडेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक सक्रिय आणि लोकप्रिय नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. डॉ. भाटीकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक सक्रिय आणि लोकप्रिय नेता गमावला असून त्यांच्या अकाली जाण्यामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love    ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *