Sunday , September 20 2026
Breaking News

डॉ. विलास चव्हाण यांची विश्वकर्मा उद्यानास भेट; पर्यावरण कार्याचे केले कौतुक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील प्रभारी प्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांनी निपाणी येथील लेटेक्स कॉलनीतील श्री विश्वकर्मा उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संवर्धनचा सुंदर संगम अनुभवायला
मिळाल्याची भावना व्यक्त व्यक्त केली. शिवाय उद्यानासाठी सतत धडपडणाऱ्या भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक
पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्या कार्याचे कौतुक केले.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून पी.एच.डी. गाईड म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल डॉ. चव्हाण यांचा गुलाब रोप आणि “करू पर्यावरणाचे रक्षण” हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले निर्मित विश्वकर्मा उद्यानाला भेट देऊन वृक्षसंवर्धन, पर्यावरण जपणूक आणि सौंदर्यपूर्ण उद्यान निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले. समाजात शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे हे कार्य प्रेरणादायी असून अशा उपक्रमांची आज समाजाला गरज असल्याचे सांगितले.
डॉ. चव्हाण यांच्या संशोधन क्षेत्रातील कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना निश्चितच नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *