Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन

  येळ्ळूर : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे आज येळ्ळूर गावामध्ये वित्तीय समावेशन विभागातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे युनियन बँक ऑफ इंडिया बेळगावचे क्षेत्र प्रमुख श्री. राघवेंद्र बी एस, उप क्षेत्रप्रमुख श्री. मनीष मेघन्नावर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, माजी …

Read More »

शहापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने महत्वाचे फोन नंबर असलेले कॅलेंडर प्रकाशित…

  बेळगाव : शहापूर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही महत्वाचे फोन नंबर असलेले कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी, पोलीस संदीप बागडी यांच्या हस्ते कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले. महत्वाचे आणि आवश्यक फोन नंबर असणारे हे कॅलेंडर लोकांना उपयोगी …

Read More »

येळ्ळूर येथील वार्ड नंबर 4 मधील चांगळेश्वरी मंदिरच्या दक्षिण बाजूकडील भागाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण

  बेळगाव : येळ्ळूर येथील वार्ड नंबर 4 मधील चांगळेश्वरी मंदिरच्या दक्षिण बाजूकडील भागाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण ग्राम पंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या योजनेतून पूर्ण करण्यात आले. गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी साचुन नागरिकांची व भाविकांची गैरसोय होत होती. ती गैरसोय वॉर्ड क्रमांक 4 चे ग्राम पंचायत सदस्य सतीश पाटील यांच्या विशेष …

Read More »

कोर्टाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला फटकारले; उद्या 12 पर्यंत रस्ते मोकळे करा

  मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरु आहे. आजच्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो. न्यायमुर्ती रवींद्र घुगेंच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आजच्या सुनावणी …

Read More »

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

  चंदगड : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निस्वार्थीपणे संघर्ष करणाऱ्या मनोजदादांविषयी मला पहिल्यापासूनच प्रचंड आदर आहे. ते मोठ्या संयमाने आणि परखडपणे मराठा समाजाची बाजु …

Read More »

कु. निलेश जोतिबा अगसीमनी याचे एम-सेट परीक्षेत सुयश!

  बेळगाव : शिंदोळी (ता.बेळगाव) येथील कु. निलेश जोतिबा अगसीमनी याने नुकत्याच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एम- सेट परीक्षेत पहिल्या प्रयत्नात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. निलेश याने गणित विषयात एम.एसी. ही मिळविलेली असून गणित या विषयातच त्याने सेट परीक्षा चांगले गुण मिळवून प्रथम प्रयत्नात यशस्वी झाला आहे. या त्यांच्या …

Read More »

सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण मंत्रमुग्ध

‘सकाळ’तर्फे आयोजित विनय विलास कदम प्रस्तुत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष आणि ‘ओम नमस्ते गणपतये…त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि…त्वमेव केवलं कर्तासि…’, असा सामुदायिक सूर अथर्वशीर्ष पठणामुळे आसमंतात घुमला. मंत्रमुग्ध वातावरणातील या चैतन्यमयी सोहळ्यात बेळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘सकाळ’ आयोजित विनय विलास कदम प्रस्तुत सामुदायिक गणपती अथर्वशीर्ष …

Read More »

बेळगाव सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचे मनोज जरांगे -पाटील यांना पाठिंब्याचे पत्र

  मुंबई : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे काल शहरात भव्य मोर्चा काढून मनोज जरांगे -पाटील यांच्या आंदोलनाला संपूर्ण जाहीर पाठिंबा व्यक्त केल्यानंतर या पाठिंब्याचे पत्र मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुंबई येथील आंदोलनाच्या ठिकाणी जरांगे-पाटील दिले. तसेच मराठा आरक्षणाच्या …

Read More »

डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर, आर. एम. चौगुले यांनी घेतले बेनकनहळ्ळीत बाप्पांचे दर्शन….

  बेळगाव : बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील संभाजी महाराज युवक मंडळाच्या सार्वजनिक गणपतीची महाआरती रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली. खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तसेच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष श्री. आर. एम. चौगुले यांच्याहस्ते विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” …

Read More »

मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा फरशी बसवणे समारंभ उत्साहात संपन्न…

  खानापूर : श्रीदेव रवळनाथ मंदिराचा फरशी बसवणे शुभारंभ शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी मणतुर्गे येथे गावचे सुपुत्र श्री. अविनाश नारायण पाटील, उद्योजक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. विजय प्रकाश पाटील निवृत्त लष्करी हवालदार होते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत श्री. नामदेव गुंडु गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ …

Read More »