Sunday , September 20 2026
Breaking News

कु. निलेश जोतिबा अगसीमनी याचे एम-सेट परीक्षेत सुयश!

Spread the love

 

बेळगाव : शिंदोळी (ता.बेळगाव) येथील कु. निलेश जोतिबा अगसीमनी याने नुकत्याच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एम- सेट परीक्षेत पहिल्या प्रयत्नात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे.
निलेश याने गणित विषयात एम.एसी. ही मिळविलेली असून गणित या विषयातच त्याने सेट परीक्षा चांगले गुण मिळवून प्रथम प्रयत्नात यशस्वी झाला आहे.
या त्यांच्या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, यापूर्वी त्याने के-सेट परीक्षाही चांगल्या गुणांनी तो उत्तीर्ण झाला आहे. याशिवाय तो नवोदय सैनिक स्कूल परीक्षेतही उत्तीर्ण झाला आहे. एन. एम. एम. एस. परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
निलेश जोतिबा अगसीमनी हा पाहिल्यापासून एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात असून, सध्या तो दिल्ली येतील दिप्स अकादमी येथे, गणित विषयाच्या नेट परीक्षेची तयारी करत आहे.
निलेश हा गौंडवाड येतील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, महात्मा गांधी हायस्कूलचे कन्नड विषयाचे शिक्षक जोतिबा अगसीमनी व मंडोळी हायस्कूलच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका श्रीमती एस. के. दिवटे यांचा मुलगा असून त्याला त्याच्या आईवडील यांचे प्रोत्साहन मिळाले तर त्याच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून परिसरात त्याचे कौतुक केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *