Sunday , July 26 2026
Breaking News

शहापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने महत्वाचे फोन नंबर असलेले कॅलेंडर प्रकाशित…

Spread the love

 

बेळगाव : शहापूर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही महत्वाचे फोन नंबर असलेले कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले आहे.
शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी, पोलीस संदीप बागडी यांच्या हस्ते कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले.
महत्वाचे आणि आवश्यक फोन नंबर असणारे हे कॅलेंडर लोकांना उपयोगी ठरणारे आहे, असे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. शिंमाणी, यांनी कॅलेंडरचे प्रकाशन केल्यानंतर बोलताना म्हटले.
यावेळी शहापूर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सेक्रेटरी राजू सुतार, खजिनदार मंगेश नागोजीचे, हिरालाल चव्हाण, रावबहादूर कदम, हरी यलजी यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *