Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

एंजल फाउंडेशनच्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा 2022

  बेळगाव : एंजल फाऊंडेशन एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी आणि बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी आयोजित ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 चे गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर रोड बेळगाव येथे 30 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजीत करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 180 स्केटरानी सहभाग घेतला होता. या …

Read More »

काॅलेजमधील वादावादीनंतर कन्नड संघटनांची जोरदार निदर्शने

  आरपीडी क्राॅसजवळ टायर जाळून आंदोलन बेळगाव : टिळकवाडी येथील आरपीडी क्राॅसजवळ असलेल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमावेळी ध्वजावरून विद्यार्थ्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. या घटनेने सायंकाळी परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप कन्नड संघटनांनी केला आहे. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे …

Read More »

सीमाप्रश्न सुनावणी, महाराष्ट्र मंत्र्यांच्या प्रवेशाबाबत पोलीस ॲक्शन मोडवर

जिल्हा पोलीस प्रमुखांची निपाणीत बैठक : कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कडेकोट बंदोबस्त निपाणी(वार्ता) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाची सुनावणी होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळी बेळगावात येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक- महाराष्ट्र सीमाभागात बंदोबस्त वाढविला आहे. या काळात नागरिकांनी आपले व्यवहार सुरळीत ठेवावे, असे आवाहन बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव …

Read More »

निपाणीत २५ डिसेंबरला फूले, शाहू, आंबेडकर विचार संमेल घुमणार महपुरूषांच्या विचारांचा जागर

कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गेल्या पंचवीस वर्षांमध्ये सातत्याने सामाजिक परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून माध्यमातून सातत्याने बहुजन समाजातील तरुणांना महापुरुषांच्या सामाजिक समतेच्या विचाराच्या माध्यमातून दिशा मिळावी, यासाठी विचार संमेलन भरविले जात आहे. विविध जाती धर्मामध्ये सामाजिक एकोपाची व समतेची बीजे रोवली जावी व समाज गुण्यागोविंदाने राहावा हा …

Read More »

संजय राऊत यांना 7 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

  बेळगाव : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 7 फेब्रुवारी रोजी बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगावमध्ये 30 मार्च 2018 रोजी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना आज दि. 1 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, संजय राऊत आज व्यक्तिगत कारणामुळे हजर झाले …

Read More »

तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाण पुलावर भीषण अपघात; एक गंभीर जखमी

  बेळगाव : टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावर आज दुपारी भरधाव मारुती व्हॅनने दुचाकी चालकाला ठोकरल्याने भीषण अपघात झाला. ठोकरीनंतर दुचाकी चालक उड्डाण पुलावरून उडून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. एका भरधाव मारुती व्हॅनने ऍक्टिव्हाला जोराने ठोकरल्याने हा भीषण अपघात झाला. या ठोकरीनंतर दुचाकी चालक उड्डाण पुलावरून उडून पडल्याने गंभीर जखमी …

Read More »

खानापूर सीपीआयपदी मंजुनाथ नायक

  खानापूर : खानापूर पोलीस स्थानकाच्या सीपीआयपदी मंजुनाथ नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारली. खानापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय सुरेश शिंगे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मंजुनाथ नायक यांची नियुक्ती सरकारने केली आहे. त्यांनी खानापूर सीपीआय पदाची सूत्रे स्वीकारली. मंजुनाथ नायक हे …

Read More »

चंदगड तालुक्याच्या विकासासाठी राज ठाकरे यांनी लक्ष घालावे

  चंदगड : चंदगड तालुक्याच्या विकासासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनसे जिल्हा उपप्रमुख पिनु पाटील यांनी नुकतेच राज ठाकरे यांना दिले. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेला कर्नाटक- गोवा राज्याच्या सीमेलगत असलेला चंदगड तालुका पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून …

Read More »

खानापूरात लम्पी रोगाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे प्रमोद कोचेरी यांचे आवाहन

  खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र जनावरांच्या लम्पी रोगाने धुमाकूळ घातला असून खानापूर तालुक्यातील जनावरांना या लम्पी रोगाची लागण झाली आहे. सध्या खानापूर तालुक्यात जवळपास ७३ जनावरे दगावली आहेत. यासाठी भाजपचे बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी पशु खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोटगी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती …

Read More »

नूल येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर शिवसेनेची धडक

  गडहिंग्लज : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नूल या शाखेत ग्राहकांना सुविधा न देता अरे तुरे भाषा कर्मचारी वापरत असल्याची काही दिवसापासून चर्चा सुरू होती. दोन दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी शाखेमध्ये शेतीच्या कामासाठी बँक खाते 10 लोकांनी खाते काढण्यासाठी अर्ज सादर केले. पण कर्मचाऱ्यांनी खाते ओपन करून पासबुक न देता आज- …

Read More »