Monday , September 21 2026
Breaking News

तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाण पुलावर भीषण अपघात; एक गंभीर जखमी

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावर आज दुपारी भरधाव मारुती व्हॅनने दुचाकी चालकाला ठोकरल्याने भीषण अपघात झाला. ठोकरीनंतर दुचाकी चालक उड्डाण पुलावरून उडून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.

एका भरधाव मारुती व्हॅनने ऍक्टिव्हाला जोराने ठोकरल्याने हा भीषण अपघात झाला. या ठोकरीनंतर दुचाकी चालक उड्डाण पुलावरून उडून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच टिळकवाडी आणि वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमी दुचाकी चालकाला तातडीने उपचारांसाठी इस्पितळात दाखल केले. अपघातानंतर मारुती व्हॅन पुलावरील दुभाजकावर चढली तर ऍक्टिव्हा व्हॅनच्या खाली अडकली होती. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *