Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं आहे. नवी दिल्लीत ‘नो मनी फॉर टेरर’ या विषयावर आयोजित परिषेदत ते बोलत होते. दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा हाच या परिषदेचा मुख्य विषय होता. दहशतवाद आपल्या दारापर्यंत येईपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही असंही …

Read More »

25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा एल्गार

  कोल्हापूर : आम्हाला कोणाचे देणंघेणं नाही, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांना आता मैदानातचं जाब विचारला जाईल, असा …

Read More »

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात उद्योग मेळावा संपन्न

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयाच्या उद्योगकोष आणि एनआयआयटीच्या संयुक्त आश्रयाखाली आयसीआयसीआय बँकेमध्ये नियुक्तीसाठी उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे उद्योग कोष अधिकारी डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी या मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले. या मेळाव्याला उपस्थित असलेले एनआयआयटीचे अधिकारी …

Read More »

खानापूर जांबोटी क्राॅसवर भरदिवसा पथदीप सुरूच

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील खानापूर जांबोटी महामार्गावर शुक्रवारी दि. १८ रोजी भरदिवसा पथदिप सुरूच होते. एकीकडे हेस्काॅम खात्याचे वीज बचत करण्याचे आवाहन करते. वेळेत बील भरले नाही. तर वीजपुरवठा बंद करते. मात्र भर दिवसा शहारातील वर्दळीच्या ठिकाणी विद्युत खांबावर दिवसा पथदिप सुरूच असतात. असाच प्रकार मागील …

Read More »

इरफान तालिकोटी यांना खानापूर मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देण्याची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि समाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांना कर्नाटक काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पक्षाकडे दिले. इरफान तालिकोटी हे खानापूर मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. केपीसीसी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आव्हान केल्याप्रमाणे काँग्रेस पक्षातून उमेदवारीसाठी …

Read More »

प्राईड सहेलीतर्फे सांबरा विमानतळावर रंगला स्वरांचा मेळावा

  बेळगाव : संगीत हा मानवाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. जेव्हा तो खुश होतो तेव्हा एखादे गाणे गुणगुणतो दुखी झाला तर एखादे गाणे ऐकतो. संगीतामुळे मनाला शांती मिळते. म्हणून मानवाच्या जीवनात संगीताचे एक वेगळे महत्त्व आहे. असाच एक संगीताचा वेगळा सोहळा बाल दिना दिवशी संध्याकाळी प्राईड सहलीने विमानतळावर आयोजित केला …

Read More »

बेळगावात १९ डिसेंबरपासून दहा दिवस हिवाळी अधिवेशन

  मंत्रिमंडळाचा निर्णय; गोकाक येथे माता-बाल रुग्णालय, नवीन चंदन धोरणास मंजूरी बंगळूर : विधिमंडळाचे अधिवेशन येत्या १९ ते ३० डिसेंबर दरम्यान बेळगावातील सुवर्ण विधानसौधमध्ये घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. …

Read More »

बेळगाव जिल्ह्याला बोम्माई यांच्याकडून सावत्रपणाची वागणूक

  आम आदमी पक्षाचे जिल्हाधिकऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. बेळगाव : बेळगाव जिल्ह्याला नेहमीच कर्नाटक सरकारने सावत्रपणाची वागणूक दिली जाते. स्मार्टसिटी असलेल्या बेळगाव शहराला तसेच जिल्ह्याला डावलून हुबळी धारवाड, कुलबुर्गी, बंगळूरु आणि मंगळूरच्या हद्दीत हायटेक सिटी उभारण्याची घोषणा करून बेळगाव जिल्ह्याला सावत्रपणाची वागणूक दिली आहे, अशी खंत आम आदमी पक्षाचे नेते …

Read More »

कोल्हापूरचा बालगोपाल संघ अरिहंत चषकाचा मानकरी

पटकावले एक लाखाचे बक्षीस : सिल्वासा संघ उपविजेता निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निपाणी फुटबॉल अकॅडमीच्या सहकाऱ्यांने गुरुवारी (ता.१७) झालेल्या ‘अरिहंत चषक’ फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात सिल्वासा संघाला ४-० फरकाने हरवून कोल्हापूर येथील बालगोपाल  संघाने विजय मिळवला. त्यामुळे या संघाने रोख १ …

Read More »

नगरसेवक तोहिद यांच्या प्रयत्नाने कूपनलिका खुदाई

    खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर २ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई वार्ड नंबर दोनचे नगरसेवक तोहिद चांदखन्नावर यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीच्या वार्ड नंबर दोन मधील रहिवासी जॅकी फर्नाडीस, इस्माईल नंदगडी, राजेंद्र रायका, विशाल रायका, शंकर देसाई, आर. आय. …

Read More »