Sunday , July 26 2026
Breaking News

प्राईड सहेलीतर्फे सांबरा विमानतळावर रंगला स्वरांचा मेळावा

Spread the love

 

बेळगाव : संगीत हा मानवाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. जेव्हा तो खुश होतो तेव्हा एखादे गाणे गुणगुणतो दुखी झाला तर एखादे गाणे ऐकतो. संगीतामुळे मनाला शांती मिळते. म्हणून मानवाच्या जीवनात संगीताचे एक वेगळे महत्त्व आहे. असाच एक संगीताचा वेगळा सोहळा बाल दिना दिवशी संध्याकाळी प्राईड सहलीने विमानतळावर आयोजित केला होता. यालाच वेगळेपण लाभले होते कारण हा ऑर्केस्ट्रा अंध विद्यार्थ्यांचा होता. जो या विद्यार्थ्यांनी समन्वया ब्लाइंड ऑर्केस्ट्रा या नावाने सुरू केला आहे.
देवाने यांची एक शक्ती काढून घेतली असली तरी त्यांना आवाजाची संगीताची शक्ती भरभरून दिली आहे. या आर्केस्ट्रामध्ये दहा जण आहेत. यांचा आवाज इतका सुमधुर आहे की त्यांची गाणी थांबू नये असे वाटत होते, यांनी आपल्या सुमधुर आवाजात मराठी, हिंदी व कन्नड गीते गाईली व सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.
रोजच्या धकाधकीच्या कामातून त्यांना थोडा विरंगुळा मिळावा व त्यांची थोडी करमणूक करावी या उद्देशाने हा आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. हा ऑर्केस्ट्रा प्राईड साहेलीने आयोजित केला होता त्याचे देणगीदार डॉक्टर समीर पोटे व अरुंधती पोटे होत्या.
यांचा हा सूमधुर ऑर्केस्ट्रा चालू असताना तेथे उपस्थित असलेल्या काही पॅसेंजर यांनीही त्यांना देणगी दिली. त्याचप्रमाणे विमानतळ अधिकाऱ्यांनीही देणगी दिली तसेच स्टार विमान सेवा व इंडिगो विमान सेवा यांनी गिफ्ट हंपर्स दिले.
सामान्य ब्लाइंड ऑर्केस्ट्रा यांनी विमानतळ अधिकारी राजेश कुमार मौर्य व महेंद्र साळवी व प्राईड सहेलीचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र साळवी सरांनी केले. आभार मानून कार्यक्रमाची सांगता प्राईड सहेलीचा अध्यक्ष आरती शहा यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *