Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर जांबोटी क्राॅसवर भरदिवसा पथदीप सुरूच

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील खानापूर जांबोटी महामार्गावर शुक्रवारी दि. १८ रोजी भरदिवसा पथदिप सुरूच होते.
एकीकडे हेस्काॅम खात्याचे वीज बचत करण्याचे आवाहन करते. वेळेत बील भरले नाही. तर वीजपुरवठा बंद करते. मात्र भर दिवसा शहारातील वर्दळीच्या ठिकाणी विद्युत खांबावर दिवसा पथदिप सुरूच असतात. असाच प्रकार मागील चार दिवसापूर्वी दिसून आला होता. तेव्हा खानापूर शहरात वारंवार भर दिवसा पथ दिप सुरूच ठेवून वीजेचा दुरूपयोग करू नये, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.
याकडे संबंधित हेस्काॅम खात्याने तसेच नगर पंचायतीने गांभिर्याने लक्ष देऊन भरदिवसा पथ दिप सुरू ठेवणे कटाक्षाने टाळावेत. याकडे संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष असणे गरजेचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *