Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

गौंडवाडच्या सतीश पाटील खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

  बेळगाव : मंदिराच्या जागेच्या वादातून खून झालेल्या बेळगाव तालुक्यातील गौंडवाड येथील सतीश पाटील यांच्या कुटुंबीयांना सुमारे तीन वर्षांनी न्याय मिळाला आहे. या प्रकरणात ९ पैकी ५ आरोपींना जन्मठेप, तर ४ जणांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली असून, एकूण १३ लाख ७५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. बेळगाव तालुक्यातील गौंडवाड …

Read More »

शाहुनगर येथील इटर्निया कंपौंड व्हेंचर्स नामक कंपनीकडून 89 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध तक्रार

  बेळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे सांगून सावजांना ठकवण्याचे सायबर गुन्हेगारांचे प्रकार सुरुच आहेत. बेळगाव येथेही एका कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात गंडविल्याचे उघडकीस आले असून यासंबंधी फशी पडलेल्या गुंतवणूकदारांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. सुमारे 89 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. फसवणुकीच्या या …

Read More »

मराठा बँकेला 2 कोटी 48 लाख नफा; उद्या सर्वसाधारण सभा

  बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेने 31 मार्च 2025 अखेर 2 कोटी 48 लाख नफा मिळविला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. बाळाराम पाटील व संचालकांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 24 ऑगष्ट 2025 रोजी सकाळी 11.00 वा. मराठा मंदीर, खानापूर रोड, बेळगांव येथील “अर्जुनराव …

Read More »

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत एन. के. एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी अनिश ए. कोरे याचे यश

  बेळगाव : जिल्हा प्री-युनिव्हर्सिटी शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत एन. के. एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनिश ए. कोरे या विद्यार्थ्याने ५०, १०० व २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळविला. तीनही गटांमध्ये मिळवलेले यश अनिशसाठी तसेच संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या …

Read More »

गेल्या दहा वर्षांपासून श्रावण महिन्यात सोशल मीडियापासून दूर..

  बेळगाव : येथील सामाजिक कार्यकर्ते आणि संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे यांनी २०१५ सालापासून श्रावण महिन्यात सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णही केला असा निर्णय घेणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुम्ही या महिन्यात आध्यात्मिक आणि भावनिक दृष्ट्या अधिक जोडले जाऊ शकता, तसेच तुमच्या दैनंदिन …

Read More »

झाडनावगे गावाजवळील नाल्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील झाडनावगे गावाजवळील नाल्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या सुदाम शामराव गावडे (वय ४९) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी त्यांचा मृतदेह नाल्यात आढळून आला. गुरुवारी सुदाम गावडे मासे पकडण्यासाठी गेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. …

Read More »

श्री गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शक सूची जाहीर

  बेळगाव : बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव अपूर्व उत्साहात सुरळीत शांततेने पार पडावा यासाठी शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी उत्सव काळात सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांनी कोणती खबरदारी घ्यावी, कोणत्या सूचना पाळाव्यात याबाबत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. श्री गणेश उत्सवासाठी पोलिसांची मार्गदर्शक …

Read More »

बेळगाव शहर परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमने वीजतारांची तपासणी व देखभालीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत शहराच्या बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे. F-1 : टिळकवाडी फिडर F-2 : हिंदवाडी फिडर F-3 : जक्केरी होंड फिडर F-4 : एस. व्ही. कॉलनी …

Read More »

धर्मस्थळ प्रकरणात मोठा ट्विस्ट: तक्रारदार मुखवटा घातलेल्या व्यक्तीला अटक

  बेंगळुरू : धर्मस्थळात मृतदेह पुरण्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. तक्रारदार मुखवटा घातलेल्या व्यक्तीला एसआयटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. एसआयटी अधिकाऱ्यांनी मुखवटा घातलेल्या व्यक्तीने सांगाड्यांसाठी दर्शविलेल्या १५ ठिकाणी शोध घेतल्यानंतर, मुखवटा घातलेल्या व्यक्तीची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, त्याने जे सांगितले ते खोटे असल्याचे उघड झाले. त्याने खोटे बोलल्याची …

Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

  खानापूर : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली खानापूर तालुक्‍यातील संगरगाळी येथील रहिवासी विष्णू परशुराम कडोलकर (वय 35) याला बेळगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही घटना 2024 साली घडली होती. आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून …

Read More »