Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

गोजगा, आंबेवाडी येथे काळ्या दिनाची जनजागृती

  बेळगाव : आज दि. 15 रोजी गोजगा, आंबेवाडी येथे जावून समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले‌. सदर जागृतीपर कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते …

Read More »

यंदा एफआरपीसह अधिकचे ३५० घेणारच; राजू शेट्टी

  कोल्हापूर : चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत 13 ठराव मंजूर करण्यात आले. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर दरवर्षी प्रमाणे यांदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर “काळादिन” संदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात येईल. समितीचे पदाधिकारी, नागरिक, युवा कार्यकर्ते यांनी वेळेवर हजर राहावे, असे …

Read More »

टी20 विश्वचषकात सहभागी 16 देशांच्या संघाची संपूर्ण यादी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात उद्यापासून अर्थात 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्वच देशांनी आपआपले संघ जाहीर केले आहेत. आता जाहीर झालेल्या सर्व देशांच्या संघावर एक नजर टाकू… भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक …

Read More »

माओवादी कनेक्शन प्रकरणी जी.एन. साईबाबांची निर्दोष मुक्तता निर्णयाला स्थगिती

  मुंबई : माओवादी कनेक्शन प्रकरणी जीएन साईबाबा यांच्यासह 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. कोर्टाने अखेर नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. माओवादी चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा …

Read More »

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

बेळगाव : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. ऍलन विजय मोरे व संतोष ममदापूर यांनी त्यांचा सत्कार केला. प्रमोद सावंत यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांशी संवाद साधला. त्यांची आस्थेने चौकशी केली. वृद्धाश्रमाच्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल आणि शांताईमध्ये झालेल्या या आदरातिथ्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि विजय मोरेंचे कौतुक केले. यावेळी …

Read More »

भारताची जागतिक भूक इंडेक्समध्ये घसरण; पाक, श्रीलंका, बांग्लादेश वरच्या स्थानावर

  जागतिक भूक निर्देशांकात घसरण! नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय चलनाची घसरण बाजारात चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कमी पडझड झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतंच नमूद केलं. मात्र, जागतिक भूक निर्देशांकात मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घरसरण झाल्याचं धक्कादायक …

Read More »

भारतीय महिलांनी जिंकला आशिया चषक

  सिल्हेट : महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला. तब्बल आठ गडी राखून श्रीलंकेचा दारूण पराभव केला. 25 चेंडूत 50 धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. रेणुका सिंगने 3 षटकात 3 गडी बाद केले तिला …

Read More »

हत्तरगुंजीची चिमुकली भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी

  खानापूर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूर तालुक्यातील चिमुकलीचाही सहभाग लक्षवेधी ठरला. काल भारत जोडो यात्रेत खानापूरमधून हजारो कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये हत्तरगुंजी येथील सविता व गुंडू मयेकर यांची कन्या कु. तेजस्विनी गुंडू मयेकर ही देखील खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासोबत सहभागी झाली होती. कालच्या भारत …

Read More »

रिंगरोड प्रकल्प उधळून लावणे गरजेचे : माजी आम. मनोहर किणेकर

  बेळगाव : बेळगाव तालुक्यात रिंगरोडसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादन करण्यासाठी वृत्तपत्रात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. हा रिंगरोड तालुक्यातील शेतकर्‍यांना अधोगतीला नेणारा आहे. येथील शेतकर्‍यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीवरच येथील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह चालत आहे. शेतीचा जोडधंदा दुग्धव्यवसायही अवलंबून आहे. यासाठी शेतकर्‍यांनी हा रिंगरोड प्रकल्प उधळून लावणे गरजेचे आहे. तेव्हा …

Read More »