Tuesday , June 2 2026
Breaking News

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

Spread the love

बेळगाव : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. ऍलन विजय मोरे व संतोष ममदापूर यांनी त्यांचा सत्कार केला. प्रमोद सावंत यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांशी संवाद साधला. त्यांची आस्थेने चौकशी केली. वृद्धाश्रमाच्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल आणि शांताईमध्ये झालेल्या या आदरातिथ्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि विजय मोरेंचे कौतुक केले.

यावेळी श्रीमती मारिया मोरे, चेरील मोरे, वसंत बालिगा, प्रसन्न घोटगे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनांना शिवसेना (उबाठा)चा जाहीर पाठिंबा

Spread the love  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय पाठबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *