Sunday , July 26 2026
Breaking News

गोजगा, आंबेवाडी येथे काळ्या दिनाची जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : आज दि. 15 रोजी गोजगा, आंबेवाडी येथे जावून समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले‌.

सदर जागृतीपर कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, माजी महापौर श्री. शिवाजीराव सुंठकर, सचिव एम. जी. पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, संतोष मंडलीक, चेतन पाटील, बाबाजी देसूरकर, उमेश पाटील, नागेश देसूरकर तसेच गावचे नेते, कार्यकर्ते, इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *