Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची गुरुवारी बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सभा गुरूवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे आयोजित केली आहे. सदर बैठकीत २१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जनजागृती मोहीमे संदर्भात तसेच १ नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी …

Read More »

दीपावलीच्या विशेष खरेदीसाठी गृहशोभातर्फे प्रदर्शनाचे 14 पासून आयोजन

  बेळगाव : वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांचे स्टॉल्स आयोजित करून ग्राहकांना वेगळी पर्वणी देणाऱ्या ‘गृहशोभा’ या बेंगलोरस्थित आयोजकातर्फे बेळगावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दि. 14 ते 23 ऑक्टोबर दरम्यान खानापूर रोडवरील मंगल मेटल शेजारच्या खुल्या जागेत १० दिवस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 70 हून अधिक मोठे स्टॉल्स …

Read More »

महाराष्ट्रातून विक्रीसाठी आलेला अर्धा किलो गांजा जप्त

  निपाणी पोलिसांची कारवाई : आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातून दुचाकीवरून कर्नाटकात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या एका युवकाला मोठ्या शिताफीने निपाणी पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना मंगळवारी (ता.११) घडली. अमीर बशीर जमादार (वय २१ राहणार तेरवाड ता. शिरोळ) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे सहा हजार रुपये …

Read More »

“गोल्डन स्क्वेअर”च्या बुद्धीबळपटूंची जिल्हास्तरावर बाजी : झाली राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : बैलहोंगलमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यनगर -बेळगाव येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेत सेंट जोसेफ स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या श्रद्धा करेगार, केएलएस स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या अदिती चिखलव्हाळे, अल्पसंख्यांक मोरारजी देसाई रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या नूतन विजयकुमार पाटील, केएलएस …

Read More »

नंदगड ग्रा. पं. मासिक सभेत पीडीओ गैरहजर, बैठक वादळी

  खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीची मासिक बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत ग्राम पंचायतीचे पीडीओ गैर हजर होते. यावेळी बैठकीत उपाध्यक्ष व सदस्यांनी ग्राम पंचायत पीडीओ आनंद भिंगे यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका असल्याने लोकायुक्तांच्याकडे तक्रार केली आहे. यावेळी बैठकीत ग्राम पंचायत सदस्यांनी मागणी केलेली माहिती जो पर्यंत …

Read More »

समस्या संपवण्यासाठी राज्य नोकर संघ कार्यरत

  राज्य सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी : निपाणीत सरकारी नोकर संघाची सभा निपाणी (वार्ता) : सरकारी कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी संघटनेने काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. आपण नेहमीच सीमावाशीय सरकारी नोकरांच्या पाठीशी आहोत. या पुढील काळात सरकारी नोकरांनी जागृत राहून काम …

Read More »

लैला शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) संचालित श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊसाची मोळी पुजन व गव्हाणीत ऊस टाकून करण्यात आला. यावेळी गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, प पू रामदास महाराज विश्वात्मक गुरूदेव सिध्दाश्रम मठ तोपिनकट्टी, प पू चन्नबसव देवरू रूद्र स्वामी मठ …

Read More »

शिंदे गटाचे चिन्ह “ढाल-तलवार”

  मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटालाही नवं चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असून ढाल-तलवारीचं चिन्ह देण्यात आली आहे. त्रिशूळ …

Read More »

उद्धव ठाकरेंच्या “मशाल” चिन्हाचे पिरनवाडीत जोरदार स्वागत!

  बेळगाव : बेळगाव सीमा लढ्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेलला कामगार आणि शेतकरी होते तेच चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचा आनंद यावेळी व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्षाच्या नवीन नावाचे आणि चिन्हाचे बेळगावात देखील जल्लोषी स्वागत झाले. पिरनवाडी येथे तालुका प्रमुख सचिन …

Read More »

केंद्र सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार गुडन्यूज?

  नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून रब्बी पिकांसाठी एमएसपीची घोषणा करण्यात आली नाही. ही घोषणा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत होते. मात्र यावेळी उशीर झाल्याने शेतकरी आतूरतेनं याची वाट पाहात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच एमएसपीची घोषणा करू शकते. सीएसीपीने रब्बी पिकांसाठी ३ ते ९ टक्क्यांपर्यंत एमएसपी वाढवण्याची शिफारस केली आहे. …

Read More »