Monday , September 21 2026
Breaking News

शिंदे गटाचे चिन्ह “ढाल-तलवार”

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटालाही नवं चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असून ढाल-तलवारीचं चिन्ह देण्यात आली आहे.

त्रिशूळ आणि गदा आधीच केली बाद…

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीची त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली होती. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्यानंतर ठाकरे गटाने दिलेल्या दुसऱ्या पसंतीवरील मशालला चिन्हाला निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *