Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

कोडचवाडात दुर्गामाता दौडची सांगता

  खानापूर (प्रतिनिधी) : कोडचवाडात (ता. खानापूर) येथे दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली. यावेळी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली. गेल्या आठ दिवसांपासून नवरात्र महोत्सव निमित्ताने सुरू असलेल्या दुर्गामाता दौडला आमाप प्रतिसाद मिळाला होता. यावेळी कोडचवाडातील युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता गावात भगवेमय …

Read More »

मदत करण्याच्या बहाण्याने बनावट एटीएम देऊन खात्यावरील रक्कम काढणाऱ्या भामट्याला अटक

  चिक्कोडी पोलिसांची कारवाई अंकली (प्रतिनिधी) :  एटीएममधून रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना मदत करण्याच्या निमित्ताने त्यांना फसवून त्यांचे एटीएम घेऊन दुसरे एटीएम देऊन त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून फसवणाऱ्या एका भामट्याला चिक्कोडी पाेलिसांनी अटक करण्यात आली असून सदर भामटा हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील रहिवासी असून अमोल दिलीप सकटे (वय …

Read More »

धर्मवीर संभाजीनगर सार्वजनिक सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन उत्साहात

  बेळगाव : धर्मवीर संभाजीनगर वडगांव येथील नियोजित नूतन सार्वजनिक सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 5/10/2022 रोजी दुपारी 2:00 वा. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजीराव जाधव, ज्येष्ठ वास्तूशास्त्र अभ्यासक सतीश निलजकर, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, …

Read More »

संकेश्वरात विकासकामांचा शुभारंभ…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील सर्व प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगरोथान योजनेतून ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सदर विकास कामांचा शुभारंभ नुकताच नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, अमर नलवडे, डॉ. जयप्रकाश करजगी, नगरसेविका शेवंता कब्बूरी, श्रीविद्या बांबरे, रिजवाना रामपूरे, तसेच अन्य …

Read More »

श्री दुर्गामाता अदभूत दौड : ए. बी. पाटील

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील श्री दुर्गामाता दौडने युवा वर्गात देशाभिमान धर्माभिमान जागविण्याचे अदभूत कार्य केल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते आज श्री दुर्गामाता दौडच्या सांगता कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होते. ए. बी. पाटील यांनी हातात ध्वज घेऊन दौडमध्ये आपला सहभाग दर्शविला. ते पुढे म्हणाले, श्री …

Read More »

चिगुळे – कोदाळी रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन

  खानापूर (तानाजी गोरल) : महाराष्ट्र , कर्नाटक सीमेलगतच्या गावासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या हद्दीत रस्ता करावा, यासाठी खानापूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांना कोल्हापूर येथे भेटून रस्त्यासंदर्भात निवेदन दिले. कणकुंबी, चिगुळे, कोदाळी येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये गंगा भागिरथी यात्रा होणार आहे. या यात्रेत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक तिन्ही …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

  शोपियान (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी ४ स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. पहिली चकमक द्राच भागात झाली. या ठिकाणी तिघा दहशतवाद्यांना मारण्यात आले. हे तिघेजण स्थानिक असून ते दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल संध्याकाळी सुरक्षा दल आणि …

Read More »

मातृशक्तीचा सन्मानही आवश्यक : मोहन भागवत

  नागपूर : डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून आरएसएसच्या कार्यक्रमात महिलांचा सहभाग आहे. अनसूया काळे यांच्यापासून अनेक महिलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. आपल्याला निम्म्या लोकसंख्येला सन्मान आणि योग्य सहभाग द्यायचा आहे. ‘माणूस जे काही करू शकतो, ते सर्व काम मातृशक्तीनेही होऊ शकते. पण स्त्रिया करू शकतील असे सर्व …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी एक वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन मधील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित केली आहे. तरी तालुक्यातील सर्व समितीप्रेमी नागरिकांनी व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी …

Read More »

बस दरीत कोसळून ३२ प्रवाशांचा मृत्यू, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

  पौडी गढवाल : उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एक बस 500 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस वऱ्हाडींना घेऊन हरिद्वारमधील लालढांग येथून काडागावकडे जात होती. सिमडी गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत पडली. पौरी गढवाल जिल्ह्यातील बीरोखाल भागात रात्री …

Read More »