Sunday , July 26 2026
Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love

 

शोपियान (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी ४ स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. पहिली चकमक द्राच भागात झाली. या ठिकाणी तिघा दहशतवाद्यांना मारण्यात आले. हे तिघेजण स्थानिक असून ते दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. दरम्यान, शोपियानच्या मूलू भागात आज बुधवारी सकाळी आणखी एक चकमक झाली. त्यात लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला मारण्यात आले.

“जैश-ए-मोहम्मदशी संबंध असलेले तीन स्थानिक शोपियनच्या द्राच भागातील चकमकीत ठार झाले. मूलू येथे दुसरी चकमक सुरू आहे,” अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत दिली आहे. हनान बिन याकूब आणि जमशेद अशी दोन ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांचा पुलवामा येथे नुकत्यात झालेल्या विशेष पोलीस अधिकारी जावेद दार यांच्या हत्येमध्ये सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *