Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

पावसाची संततधार सुरूच; उद्याही बेळगाव जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी

  बेळगाव : आज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच असलेल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच अंगणवाड्या आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना उद्या बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तसा आदेश बजावला आहे. सदर आदेशाचे …

Read More »

येळ्ळूर येथील श्री कलमेश्वर मंदिर कळस स्लॅब भरणी कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील श्री कलमेश्वर मंदिर जिर्णोद्धार कमिटीतर्फे आयोजित श्री कलमेश्वर मंदिर कळस स्लॅब भरणी शुभारंभ कार्यक्रम काल रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. येळ्ळूरचे माजी जि. पं. सदस्य रमेश परशराम गोरल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रा. पं. सदस्या …

Read More »

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

  मुंबई : 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाचा संघ जाहीर केला. यंदाचा आशिया कप टी-20 स्वरूपात रंगणार असून टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या …

Read More »

श्रीमूर्तींवर शेवटचा हाथ फिरवताना मूर्तिकारांची लगबग!

  बेळगाव: अवघ्या सात दिवसांवर गणेश उत्सव असल्याने मूर्तीकरांची लगबग वाढली आहे. यंदा बेळगाव शहरात पीओपी की शाडू हा विषय चर्चेत होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेने मूर्तिकार व विक्रेत्यांना नोटीस बजावण्याची व्यवस्था देखील केली होती. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा बेळगाव शहरात कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन होते हा मुद्दा समोर …

Read More »

बिम्स वसतिगृहात वैद्यकीय विद्यार्थिनीची औषध सेवन करून आत्महत्या!

  बेळगाव : बेळगावमधील बिम्स वसतिगृहात एका वैद्यकीय विद्यार्थिनीने औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी बंगळुरू येथील रहिवासी असून प्रिया कार्तिक (२७) असे तिचे आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात रुग्ण तपासणीचा अभ्यास करणाऱ्या प्रियाने रात्री आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळले आहे. घटनास्थळी भेट दिलेले …

Read More »

पावसाचा जोर कायम; चिक्कोडी तालुक्यातील ८ पूल पाण्याखाली

    बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, वेदगंगा आणि दूधगंगा या पाच नद्या दुथडी भरून वहात आहेत, ८ पूल पाण्याखाली गेले आहेत आणि १८ गावांचा रस्त्यापासून संपर्क तुटला आहे. चिक्कोडी तालुक्यातील ८ खालच्या पातळीचे पूल एकाच रात्रीत पाण्याखाली गेले आहेत. यामुळे तालुक्यातील १८ गावांचा रस्ता संपर्क तुटला आहे. …

Read More »

कावळेवाडी क्रॉस जवळील अपघातातील जखमी मामाचाही मृत्यू

  बेळगाव : बिजगर्णी-बेळवट्टी रस्त्यावरील कावळेवाडी क्रॉसजवळ रविवारी (दि. 17) सायंकाळी झालेल्या कार-दुचाकी अपघातात बेळवट्टी येथील रोहिणी रामलिंग चौगुले या तरुणीचा मृत्यू झाला होता. तर तिची आई व मामा गंभीर जखमी झाले. त्यामधील मामाचा सोमवारी (दि. 18) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सतीश विष्णू मोहिते (वय …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने आर्ष विद्या आश्रमात गोकुळाष्टमी व रक्षाबंधन उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने टिळकवाडीतील आर्ष विद्या आश्रम येथे गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आश्रमात महाराष्ट्र, कर्नाटक तसेच मणिपूर येथील 45 अनाथ मुलींचे योग्य शिक्षण आणि संगोपन केले जाते. प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून परिषदेच्या उपक्रमांची माहिती करून दिली. …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

  मुंबई : हिंदी-मराठी चित्रपटात साकारलेल्या चरित्र भूमिकांमधून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. येत्या २२ ऑगस्टला त्यांचा ९१ वा वाढदिवस साजरा होणार होता, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पोतदार यांच्या कन्या अनुराधा पारसकर यांनी दिली. त्यांंच्या पार्थिवावर …

Read More »

नवीलुतीर्थ, राजलखमगौडा जलाशय पूर्ण क्षमतेने भरली; पाण्याचा विसर्ग

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे मलप्रभा आणि घटप्रभा नद्या दुथडी भरून वहात आहेत आणि दोन्ही जलाशयांमधून पाणी सोडले जात आहे कारण जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सौंदत्ती तालुक्यातील मुनळ्ळळी येथील नवीलुतीर्थ जलाशयात येणारा प्रवाह वाढत आहे. २०७९.५० फूट क्षमता असलेल्या नवीलुतीर्थ जलाशयात सध्या २०७७.५० फूट पाणी आहे. …

Read More »