Sunday , September 20 2026
Breaking News

पावसाची संततधार सुरूच; उद्याही बेळगाव जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी

Spread the love

 

बेळगाव : आज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच असलेल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच अंगणवाड्या आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना उद्या बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तसा आदेश बजावला आहे. सदर आदेशाचे उपसंचालक सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव आणि चिक्कोडी, उपसंचालक पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि चिक्कोडी, तसेच उपसंचालक महिला व बालकल्याण खाते बेळगाव यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *