Monday , April 20 2026
Breaking News

नवीलुतीर्थ, राजलखमगौडा जलाशय पूर्ण क्षमतेने भरली; पाण्याचा विसर्ग

Spread the love

 

बेळगाव : मुसळधार पावसामुळे मलप्रभा आणि घटप्रभा नद्या दुथडी भरून वहात आहेत आणि दोन्ही जलाशयांमधून पाणी सोडले जात आहे कारण जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सौंदत्ती तालुक्यातील मुनळ्ळळी येथील नवीलुतीर्थ जलाशयात येणारा प्रवाह वाढत आहे.

२०७९.५० फूट क्षमता असलेल्या नवीलुतीर्थ जलाशयात सध्या २०७७.५० फूट पाणी आहे. जलाशय भरण्यासाठी फक्त २ फूट पाणी शिल्लक आहे. ७१७० क्युसेकची आवक असताना, जलाशयातून ५५९४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, हुक्केरी तालुक्यातील हिडकलजवळ बांधलेला राजलखमगौडा जलाशय जवळजवळ भरला आहे. २१७५ फूट क्षमता असलेल्या या जलाशयात सध्या २१७४.६६ फूट पाणीसाठा आहे. १३,३३७ क्युसेक पाण्याची आवक आहे. ५२९० क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे.

जलाशयांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनाने मलप्रभा, घटप्रभा आणि इतर नदीकाठी राहणाऱ्या लोकांना कडक सूचना दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *