Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

हिशेब चुकता…! भारत 6 गड्यांनी विजयी

नागपूर : भारतानं नागपूरचा दुसरा टी20 सामना जिंकून मोहालीतल्या पराभवाचं उट्ट काढलं. आधी अक्षर पटेलनं गोलंदाजीत कमाल केली आणि मग रोहित शर्मा एका बाजूनं किल्ला लढवत भारताला निर्णायक विजय मिळवून दिला. ओल्या आऊटफिल्डमुळे हा सामना 8-8 ओव्हरचा खेळवण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलियानं दिलेलं 91 धावांचं आव्हान भारतानं अखेरच्या ओव्हरमध्ये 6 गडी …

Read More »

कावळेवाडीच्या कुस्तीपटुंची राज्यस्तरावर निवड

  बेळगाव : कावळेवाडी, बेळगाव येथे जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या शालेय कुस्ती क्रीडास्पर्धेत गावातील गुणवंत कुस्तीपटू पै. रवळनाथ श्रीधर कणबरकर याने 65 वजन गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर गरुडझेप घेतली आहे. रवळनाथ हा इयत्ता आठवीत असून बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी येथे शिकत आहे. मठमती कुस्ती आखाडा, सावगाव येथे सराव करीत आहे. …

Read More »

संकेश्वरात २४ तास पाणी कोठे आहे?

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात २४ तास पाणीपुरवठा नसताना मिटर रेडिंगनुसार पाण्याची बिले आकारणी कशासाठी? असा प्रश्न नगरसेवकांनी पालिका सभेत उपस्थित करताच मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, अभियंता आर. बी. गडाद यांची गोची झालेली दिसली. सर्वच २८ सदस्यांनी संकेश्वरातील अन्यायकारक पाणीपट्टी त्वरीत थांबवून वर्षाकाठी २ हजार रुपये पाणीपट्टी आकारणी करण्याची …

Read More »

वडगाव भागात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी

  बेळगाव : शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने शहरातील प्रमुख मार्गावर बंदी घातली असली तरी उपनगरातून अवजड वाहनांची वाहतूक चालूच आहे. यामुळे अनेकवेळा उपनगरातील प्रमुख रस्त्यावर देखील वाहतुकीची कोंडी होत आहे. सकाळच्या वेळेत अशाप्रकारची वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशीच वाहतूक कोंडी …

Read More »

श्री शंकरलिंग सौहार्दला ५६ लाख रुपये नफा : सभासदांना २५ टक्के लाभांश जाहीर

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकरलिंग क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण हतनुरी यांनी भूषविले होते. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रध्दांजली …

Read More »

संकेश्वर मराठा समाज सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मराठा समाज सोसायटीच्या वार्षिक सभेत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व अहवाल वाचन …

Read More »

पंडित नेहरू काॅलेजमध्ये रोवर रेंजर युनिटचे उद्घाटन

  बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या रोवर रेंजर युनिट चे उद्घाटन तसेच प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत माननीय सतीश बाचीकर यांच्या हस्ते करण्यात आले. व विद्यार्थ्यी प्रतिनिधीचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत अशोक चुडाप्पा हलगेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे …

Read More »

झिरो ट्रॅफिकमधून आले धारवाडहून बेळगावला हृदय!

  बेळगाव : एका ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय धारवाड येथील एसडीएम रुग्णालयातून आज सकाळी झिरो ट्रॅफिकमधून बेळगावच्या केएलई रुग्णालयात आणण्यात आले. धारवाडहून आज शुक्रवारी पहाटे 4 वाजता निघालेली हार्ट ऍम्ब्युलन्स (हृदय घेऊन येणारी रुग्णवाहिका) पहाटे 5 वाजता बेळगावातील केएलई रुग्णालयात पोहोचली. कोप्पळ जिल्ह्यातील कुनीकेरी तांडा येथील गिरीश सोमप्पा कुरी या …

Read More »

कोगनोळी येथे नेत्रतपासणी शिबिरात 140 लोकांची तपासणी

  कोगनोळी : प्रजावाणी फाउंडेशन व कल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केअर सर्विसेस संचलित कल्लोळी नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नारायण कोळेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 140 रुग्णांची तपासणी करण्यात आली. अरुण पाटील यांनी स्वागत केले. यावेळी …

Read More »

धनलक्ष्मी सौहार्द संस्थेला 47.53 लाखाचा नफा

  अध्यक्ष रवींद्र शिंदे : 24 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : कोरोना आणि महापूर काळात सलग दोन वर्षांपासून व्यवसाय आणि बाजारपेठेतील आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अशा परिस्थितीत पतसंस्था चालवणे कठीण झाले आहे. तरीही सभासद ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्वासामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यासाठी सर्वांचा हातभार लागला आहे. प्रामाणिक …

Read More »