Monday , April 20 2026
Breaking News

कोगनोळी येथे नेत्रतपासणी शिबिरात 140 लोकांची तपासणी

Spread the love

 

कोगनोळी : प्रजावाणी फाउंडेशन व कल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केअर सर्विसेस संचलित कल्लोळी नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नारायण कोळेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 140 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
अरुण पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे, कर्मवीर भाऊराव पाटील, कैलासवासी नारायण कोळेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
लक्ष्मण जगताप यांनी कैलासवासी नारायण कोळेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार केला.
यावेळी डॉक्टर कमर शेख व सुधीर सावर्डे यांनी 140 रुग्णांची तपासणी करून 25 रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील, कृष्णात खोत, तात्यासाहेब कागले, प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर, प्रकाश गायकवाड, जय किसान प्राथमिक कृषी पत्तीनचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, अर्जुन कागले, महादेव इंगवले, संजय कोळेकर, संतोष पाटील, संतोष माने, अमृत चव्हाण, श्रीपती गोरडे, प्रशांत नवाळे, युवराज परीट, सचिन परिट, अनिल पाटील, सुनिल काशिद, ग्राम पंचायत सदस्या मनिषा परिट, शोभा मानगांवे, रुपाली वडर, यांच्यासह प्रजावाणी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *