Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

डी. के. शिवकुमारांच्या अडचणीत वाढ

उच्च न्यायालयाच्या आदेशाला ‘सर्वोच्च’ स्थगिती बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना करचुकवेगिरीचे खटले सोडण्याच्या निर्णयाविरोधात आयकर विभागाने दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाने केलेल्या काही निरीक्षणांना स्थगिती दिली. न्यायालयाने या प्रकरणी …

Read More »

खानापूरात भाजपच्या वतीने मोफत बुस्टर डोस देण्यास प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोमवारी दि. 19 रोजी येथील सरकारी दवाखान्यात मोफत बुस्टर डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील जनतेने याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुस्टर डोसचा प्रारंभ भाजप नेते तालुका मेडिया प्रमुख व माजी शहर अध्यक्ष …

Read More »

जनावरांच्या लंपीबाबत शेतकर्‍यांनी घाबरू नये : युवा नेते उत्तम पाटील

अरिहंत दूध संस्थेतर्फे मोफत लसीकरण निपाणी (वार्ता) : गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जनावरांना लंपी आजार जडला आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक सीमाभागात त्याचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आपण दूध संस्थेतर्फे बोरगाव आणि परिसरातील सर्वच जनावरांना मोफत लसीकरण सुरू …

Read More »

ब्रह्मनाथ सौहार्दला 1.81 कोटीचा नफा

  अध्यक्ष बाहुबली हरदी : 33 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सभासद, ठेवीदार, ग्राहकांना सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा सर्वांच्या सहकार्याने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहेत. चिकोडी येथे नुतन शाखा स्थापन करण्यात येत आहे. संस्थेला अहवाल सालात 1,81,40,138 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर, सभासदांना सर्वाधिक 25% …

Read More »

नवरात्रोत्सव म्हणजे असत्यावर सत्याचा विजय 

रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : निपाणीत मंडप शुभारंभ निपाणी(वार्ता) : नवरात्रोत्सव हा अतिशय प्राचीन सण असून याला भारतात अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्रोत्सव म्हणजे असत्यावर सत्याचा झालेल्या विजयाचे प्रतीक आहे. हा नवरात्रोत्सवात तुम्हा सर्वांवर दुर्गा मातेची कृपादृष्टी राहावी, हीच प्रार्थना असल्याचे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले. येथील …

Read More »

तेलंगणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन!

  कोल्हापूर – तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना एका पंथाच्या श्रद्धा दुखावल्याप्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयाने जामीन दिला होता; मात्र जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगणातील के.सी.आर. सरकारने त्यांना जुन्या प्रकरणात जाणीवपूर्वक अटक करून त्रास देण्याचा प्रकार चालवला आहे. एकूणच तेलंगणा सरकारची कृती ही पक्षपाती तथा संविधानविरोधी आहे. त्यामुळे …

Read More »

कबड्डी व व्हॉलीबॉल खेळात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना “टी-शर्ट”चे वाटप

  खानापूर : कबड्डी व व्हॉलीबॉल खेळात खानापुर तालुक्यातील कक्केरी गावच्या श्री बिष्टदेवी हायस्कूलच्या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय निवडीसाठी बेळगाव ग्रामीण भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा व खानापूर भाजपा महिला मोर्चा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी नियती फाउंडेशनच्या वतीने खेळाडूंना ‘टी-शर्ट’ वाटप केले. यावेळी बोलताना युवा नेते नागेश रामजी म्हणाले की, “ग्रामीण मुलींना …

Read More »

उदय उत्सव कार्यक्रम : अनेक मान्यवरांची उपस्थिती

  बेळगाव : दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी बेळगांवमधील जिरगे भवन येथे उदय चैनल यांच्यावतीने सेवंती व जजनी धारावाही अभिनेत्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उदय उत्सवमध्ये भाग घेतलेल्या बेळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेमध्ये बेळगांवमधील स्पेशल स्नॅक्स बनवणे, कापडी बॅग तयार करणे, आरतीचे ताट सजविणे, …

Read More »

नवहिंद सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; 12 टक्के लाभांश जाहीर

  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये उत्तम कार्य करणाऱ्या नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येथे खेळीमेळी वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. उदय जाधव हे होते. त्यांनी सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आणि सभासदांनी टाळ्या वाजवून समाधान व्यक्त केले. संस्थेकडे …

Read More »

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दारुच्या नशेत असल्याने त्यांना विमानातून खाली उतरवले?

  नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल आहे. दारुच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलने हा मुद्दा लावून धरला आहे. भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचं विमान चुकलं आणि प्रवास एक दिवस …

Read More »