Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

कॅम्प येथील रिअल इस्टेट एजंटची हत्या

बेळगाव : बेळगावच्या एका येथे एका रिअल इस्टेट एजंटची चाकूने वार करून हत्या करण्यात आली असल्याचे समजते. सुधीर कांबळे (५७) हा रिअल इस्टेट एजंटचा दुर्दैवी खून झाला. दुबईत राहणारा सुधीर दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे बेळगावला आला होता. रात्री उशिरा बेळगाव कॅम्प येथील घरात घुसून हल्लेखोरांनी सुधीरच्या पोटावर, मानेवर, हातावर व चेहऱ्यावर …

Read More »

समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध : किरण जाधव

  बेळगाव : श्री विश्वकर्मा पांचाळ मनुमन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विश्वकर्मा मूर्तीचे दर्शन घेतले. विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शाल आणि …

Read More »

अनगोळ येथे घर कोसळून आर्थिक नुकसान

बेळगाव : अलीकडच्या अतिवृष्टीमुळे कमकुवत झालेले घर अचानक कोसळून सुमारे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रघुनाथ पेठ अनगोळ येथे शुक्रवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोसळलेले घर प्रकाश महादेव होळकर या भाजी विक्रेत्याच्या मालकीचे आहे. प्रकाश हा रस्त्याकडेला भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. …

Read More »

शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही : मंत्री गोविंद कारजोळ

  बेळगाव : पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करावी. संयुक्त पाहणीनंतरही काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून त्याचा समावेश करावा, अशा सूचना जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिल्या. आज शनिवारी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि अलीकडच्या काळात केलेल्या उपाययोजनांबाबत झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यात …

Read More »

गोजगे येथे ’लम्पी-स्किन डिसीज’ लसीकरण शिबीर

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ’पशुसंगोपन-वैद्यकीय विभाग’ बेळगांव यांच्या सहाय्यक संघसमुहाकडून आज दि. 17 सप्टेंबर रोजी गोजगे येथे ’लम्पी-स्किन डिसीज’ या गाई, म्हशी आणि बैलांमध्ये होणार्‍या रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव विचारात घेऊन पूर्वखबरदारीखातर लसीकरण शिबीर राबविण्यात आले. यावेळी सरकारी दवाखाना आंबेवाडी-गोजगा-मण्णूर येथील डॉ. प्रदीप हन्नूरकर, डॉ. …

Read More »

द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न विधानसभेत मांडणार

  आ. श्रीमंत पाटील यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट बेळगाव : कागवाड व अथणी तालुक्यात अनेक शेतकरी द्राक्ष पीक घेतात. मात्र, गेल्या दोन – तीन वर्षात पावसामुळे आणि वादळामुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, शासन नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांवर सभागृहात चर्चा …

Read More »

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन, उद्या अंत्यसंस्कार

  मुंबई : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले. आज (17 सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना सोमवारी (12 सप्टेंबर) उपचारांसाठी नाशिक येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे धुळे, …

Read More »

खानापूर तालुका भाजपने घेतली धर्मादाय हज व वक्फ मंत्री जोल्ले यांची भेट

  खानापूर : भारतीय जनता पार्टी खानापूर यांच्या शिष्टमंडळाने बेंगलोर येथे धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यामधील रवळनाथ मंदिर खानापूर, निटुर, लोंढा, पारिशवाड, भांबार्डा, चिक्कदिनकोप, मंग्यानकोप, कोडचवाड, आमटे, बैलूर या 10 गावातील देवस्थानाला समुदाय भवनाची मागणी केली. मंत्र्यांनी या सर्व 10 गावातील समुदाय …

Read More »

हंचिनाळ ते कोगनोळी रस्ता लोकप्रतिनिधी व पीडब्ल्यूडी खात्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित

अनिल कुरणे यांचा आरोप हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी या रस्त्याच्या दयनीय अवस्थेची दखल घेण्याच्या उद्देशाने हंचिनाळ ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण शुक्रवार दि. 16 पासून सुरू करण्यात आले होते. सदर उपोषण श्री. तायगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. यावेळी बोलताना अनिल कुरणे म्हणाले की, या भागाचे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक …

Read More »

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत ग्रामीण भाजपतर्फे विविध उपक्रम : धनंजय जाधव

  बेळगाव : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेसह सर्व देशांच्या नेत्यांपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. उद्या 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजपतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »