Monday , September 21 2026
Breaking News

कॅम्प येथील रिअल इस्टेट एजंटची हत्या

Spread the love

बेळगाव : बेळगावच्या एका येथे एका रिअल इस्टेट एजंटची चाकूने वार करून हत्या करण्यात आली असल्याचे समजते. सुधीर कांबळे (५७) हा रिअल इस्टेट एजंटचा दुर्दैवी खून झाला. दुबईत राहणारा सुधीर दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे बेळगावला आला होता.

रात्री उशिरा बेळगाव कॅम्प येथील घरात घुसून हल्लेखोरांनी सुधीरच्या पोटावर, मानेवर, हातावर व चेहऱ्यावर वार करून निर्घृण हत्या केली. कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

घटनास्थळी पाहणी केल्यानंतर डीसीपी रवींद्र गडादी यांनी हत्याकांडाची माहिती दिली. ते म्हणाले की, शुक्रवारी रात्री उशिरा ही हत्या झाली. मृताचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आला. आमच्या पोलिसांनी तपास केला आहे. आम्ही लवकरच मारेकऱ्यांना शोधून काढू. मृतांची पत्नी व मुले वेगवेगळ्या खोलीत झोपली असल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. यासंदर्भात कसून चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, माहिती मिळताच कॅम्प पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा आदी सोपस्कार पूर्ण करून सुधीरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठवून देण्यात आला. कॅम्प पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास चालविला आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *