Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

कणकुंबी चेकपोस्टवर 450 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त

  खानापूर : स्थानिक उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या मालवाहू वाहनाला तालुक्यातील कणकुंबीजवळील उत्पादन शुल्क चेकपोस्टवर थांबवून तपासणी केली असता त्यात गोवा राज्यातील 450 लिटर दारू अवैधरित्या गोव्यातून कर्नाटकात आणली जात असल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान, बेंगळुरू शहरात नोंदणी केलेल्या लाल रंगाच्या स्वराज मझदा वाहनात गोवा …

Read More »

केपीटीसीएल परीक्षा गैरप्रकारातील आणखी तीन आरोपी अटकेत

  बेळगाव : केपीटीसीएलच्या परीक्षेतील गैरप्रकारांचे जाळे दिवसेंदिवस खोलवर जात आहे. बेळगाव जिल्हा पोलीस विभागाकडून एकेक आरोपींना अटक करण्यात येत आहे. आज आणखी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वीच १७ आरोपींना अटक केली असून आजपर्यंत अटक केलेल्यांची संख्या …

Read More »

…अन्यथा शिवभक्तच शिवसृष्टीचे उद्घाटन करतील : रमाकांत कोंडुसकर

  बेळगाव : बेळगावात उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या कामाला बराच विलंब होत आहे. त्यामुळे येत्या 1 महिन्यात शिवसृष्टीचे उद्घाटन करण्याची मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेने केली आहे. महिन्यात शिवसृष्टीचे उद्घाटन न केल्यास आम्हीच उद्घाटन करू, असा इशाराही देण्यात आला. बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राची माहिती …

Read More »

उद्या विविध ठिकाणी विद्युत अदालत

  बेळगाव : ग्रामीण भागातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी उद्या शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावांमध्ये विद्युत अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या विजेच्या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी ऊर्जा विभाग, हुबळी वीज पुरवठा कंपनी/हेस्कॉम यांच्या वतीने दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी बेळगाव मंडळात विद्युत अदालत घेण्यात येते. त्यानुसार शनिवारी सकाळी …

Read More »

जीवन गौरव पुरस्काराने राजेंद्र पणदे सन्मानित

  निपाणी (वार्ता) : येथील आर्किटेक ऑफ इंजिनियर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील ज्येष्ठ अभियंते राजेंद्र पणदे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन बोरगावमधील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रारंभी असोसिएशनचे सदस्य व माजी सभापती अजय माने …

Read More »

स्वच्छतेची शपथ घेवून ’स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ

कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात ’स्वच्छता ही सेवा’ अभियान दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत स्वच्छतेची शपथ घेवून या अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ’स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन …

Read More »

‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदी घाला; हिंदू देवतांची टिंगल सहन करणार नाही! – हिंदु जनजागृती समितीची चेतावनी

  अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हिंदु धर्मातील मृत्यूनंतर प्रत्येकाच्या पाप-पुण्याचा हिशोब करणार्‍या ‘चित्रगुप्त’ देवता आणि मृत्यूनंतर आत्म्याला घेऊन जाणारी ‘यमदेवता’ यांना आधुनिक स्वरूपात दाखवले आहे. त्यांच्या तोंडी फालतू विनोद दिलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु …

Read More »

अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्केटिंग स्पर्धेत यश 

निपाणी (वार्ता) : मुरगुड नगर परिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मश खुल्या स्केटिंग स्पर्धेत निपाणी येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत शाळेच्या एकूण२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विविध गटांमध्ये श्रेयस मार्तंड, निनिक्षा जाधव, आर्यन चव्हाण, चिन्मय लोळसुरे, अक्षय पाटील, तनुष …

Read More »

हिंदू मुलीच्या अंत्यसंस्कारात मुस्लीम नेत्यांचा पुढाकार!

  बेळगाव : बाल्कनीतून फुले काढताना तोल जाऊन पडल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वीरभद्र नगरात घडली. या हिंदू मुलीच्या अंत्यसंस्कारात मुस्लीम नेत्यांनी पुढाकार घेऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. वीरभद्र नगर येथे राहणारी विद्याश्री हेगडे असे मृत मुलीचे नाव आहे. मूळची उडुपी जिल्ह्यातील असलेल्या मुलीच्या वडील कुटुंबासह अनेक वर्षांपूर्वी …

Read More »

माध्यम समन्वयकपदी कुंतीनाथ कलमनी यांची नियुक्ती

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार कुंतीनाथ एस. कलमणी यांची श्री. दिगंबरा जैन ग्लोबल महासभेची बेळगाव विभागसाठी माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 30 वर्षांपासून जैन समाजाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांचा प्रचार-प्रसार करणारे बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार कुंतीनाथ कलमणी यांची त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री. दिगंबरा …

Read More »