Thursday , May 28 2026
Breaking News

…अन्यथा शिवभक्तच शिवसृष्टीचे उद्घाटन करतील : रमाकांत कोंडुसकर

Spread the love

 

  • बेळगाव : बेळगावात उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या कामाला बराच विलंब होत आहे. त्यामुळे येत्या 1 महिन्यात शिवसृष्टीचे उद्घाटन करण्याची मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेने केली आहे. महिन्यात शिवसृष्टीचे उद्घाटन न केल्यास आम्हीच उद्घाटन करू, असा इशाराही देण्यात आला.

बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राची माहिती नवीन पिढीला मिळावी यासाठी शिवसृष्टीची उभारणी करण्यात येत आहे. महाराजांच्या जीवनावर आधारित त्यांचे तसेच मावळ्यांचे पुतळे उभारले जात आहेत. मात्र गेल्या 10 वर्षांपासून हे काम पूर्ण झालेले नाही. काम गोगलगायीच्या गतीने सुरू आहे. परिणामी शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन शिवसृष्टीचे उद्घाटन लवकर व्हावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी, शिवसृष्टीची निर्मिती शिवाजी महाराजांच्या नावाने निवडून आलेल्या राजकारण्यांनी पूर्ण करणे अशक्य आहे. दोन वर्षांत खाऊकट्ट्याचे उद्घाटन होते. मात्र 10 वर्षांपासून त्यांच्याकडून शिवसृष्टीची उभारणी होत नाही. तिथे शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैनिकांचे पुतळे बनवले. त्या मूर्तींचे अनावरण होत नाही. शिवरायांच्या नावावर निवडून येणाऱ्यांनी शिवसृष्टी बंद ठेवून त्यांची विटंबना चालवली आहे. एक महिन्यात उद्घाटन न झाल्यास श्रीराम सेना हिंदुस्थान आणि इतर शिवभक्तांना एकत्र येऊन उद्घाटन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे व इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या कायापालटासाठी २१५ कोटी मंजूर; भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधांचा विकास

Spread the love  बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणूका यल्लम्मा क्षेत्राच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *