Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावात अग्निवीर भरती मेळावा 19 पासून

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सेंटरच्या युनिट हेडकॉर्टर कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा येत्या सोमवार दि. 19 ते सोमवार दि. 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर युनिट हेडकॉटर्स कोटा अग्निवीर भरती मेळाव्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 19 सप्टेंबर …

Read More »

साईज्योती सेवा संघातर्फे शिक्षक दिन साजरा

  बेळगाव : आज शिक्षक दिनानिमित्त बेळगाव येथील साईज्योती सेवा संघातर्फे न्यू इंग्लिश स्कूल बिजगर्णी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक व शिक्षक बसवंतप्पा बेनी, संतमीरा हायस्कूलच्या शिक्षिका वीणा जोशी, निर्मला देसाई, तसेच येळ्ळूर येथील वाय. एच. पाटील आदींना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

गर्लगुंजीत मुसळधार पावसाने घर कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी नारायण अष्टेकर यांचे घर नंबर ६१९ हे राहते घर सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळून जमिनदोस्त झाले. या घरात गणेश मुर्ती करण्यासाठी आणलेले साचे, शेतीची अवजारे, संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच …

Read More »

डॉ. सरनोबत यांच्याकडून खानापूर येथील गणेशोत्सव मंडळांना सावरकरांच्या प्रतिमेचे वाटप

खानापूर : आज डॉ. सोनाली सरनोबत आणि श्रीज्योत सरनोबत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली आणि वीर सावरकर अभियानाला सुरुवात केली. दरम्यान, स्वातंत्र्य वीर सावकारजींचे फोटो निंगापूर गल्ली – अध्यक्ष दीपक चौगुले, मेदार गल्ली – गुरुराज मेदार, दुर्गा नगर – अमृत पाटील, बाजार गल्ली – महेश पाटील, चौराशी …

Read More »

विविध स्पर्धांचे नियोजन करून मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा : अशोक पोतदार

    बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक व प्राईड सहेली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनानी झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन‌ करून प्रार्थना म्हणण्यात आले. व्यासपीठावर हुतात्मा चौक मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार, सेक्रेटरी शिवाजी हंडे, प्राईड सहेलीच्या अध्यक्ष आरती शहा, उपाध्यक्ष स्नेहल शहा …

Read More »

बंगळुरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

  रस्ते जलमय, अनेक ठिकाणी अपार्टमेंटमध्ये पाणी, यलो अलर्ट जारी बंगळूर : राजधानी बंगळुरमध्ये रविवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गार्डन सिटी अक्षरशः हादरली आहे. बहुतांश भागात पाणी तुंबले असून रस्ते जलमय झाले आहेत. अवघ्या २४ तासांत सुमारे ८३ मिमी पाऊस पडला, जो २०१४ नंतरचा सर्वाधिक पाऊस आहे, असे केंद्रीय …

Read More »

निडसोसी मठाचा महादासोह भक्तीमय वातावरणात साजरा

        संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाचा महादासोह सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. महादासोह सोहळ्याची सुरुवात श्रीमन्निरंजन. जगद्गुरू श्री दुरदुंडीश्वर महाशिवयोगीच्या उत्सव मूर्तीच्या पालखी महोत्सवाने करण्यात आली. प्रसाद पूजा मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी केली. यावेळी कोडीमठाचे डॉ. शिवानंद राजयोगेंद्र महास्वामीजी, डॉ. मल्लीकार्जुन महास्वामीजी …

Read More »

संकेश्वरात घरातील बाप्पांना भावपूर्ण निरोप…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील घरातील गणरायांना पुढच्या वर्षी लवकर या.. असा भावपूर्ण निरोप देत पालिकेने उभारलेल्या कुत्रिम कुंडात, हौदात श्री मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता घरांतील गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली दिसली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा भावपूर्ण निरोप देत विसर्जन मिरवणुका …

Read More »

सुळगा (हिं) येथे दोघांचा शॉक लागून जागीच मृत्यू

  बेळगाव : नव्याने बांधण्यात येत असलेल्या घरावर पत्रे घरावर चढवत असताना विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील सूळगा (हिंडलगा) येथे ही घटना घडली आहे. विनायक कृष्णा कलखांबकर (वय 24, रा. सूळगा (हिं)), विलास गोपाळ अगसगेकर (वय 57, रा. …

Read More »

शिक्षक हा समाजाचा कणा आहे : डाॅ. मिसाळे

खानापूर (प्रतिनिधी) : समाजाला सुधारण्याचे काम केवळ शिक्षकच करतो. म्हणून शिक्षक हा समाजाचा कणा आहे. शिक्षकांनी मुलांना शिक्षणाबरोबरच समाजात कसे राहावे याचे नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्याचा नेहमीच समाजाने आदर करावा, असे मत डॉ. डी. एन. मिसाळे व्यक्त केले. शंभोलींग शिवाचाया महास्वामी हिरेमन्नोळी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर तहसीलदार …

Read More »