Friday , November 6 2026
Breaking News

संकेश्वरात घरातील बाप्पांना भावपूर्ण निरोप…

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील घरातील गणरायांना पुढच्या वर्षी लवकर या.. असा भावपूर्ण निरोप देत पालिकेने उभारलेल्या कुत्रिम कुंडात, हौदात श्री मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता घरांतील गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली दिसली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा भावपूर्ण निरोप देत विसर्जन मिरवणुका पुढे सरकताना दिसल्या. घरातील बाप्पांची विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या तुफान आताषबाजीत निघालेली दिसली. गेले सहा दिवस घरोघरी चाललेल्या घरातील गणेश उत्सवाची आज गौरी गणपती विसर्जनाने सांगता करण्यात आली. सायंकाळी चार वाजता सुरू झालेली फटाक्यांची आतषबाजी रात्री उशीरापर्यंत चाललेली दिसली. पर्यावरणप्रेमींनी फटाक्यांच्या आतषबाजीला फाटा देऊन, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा भावपूर्ण निरोप देत श्रीमूर्तींचे विसर्जन केले. बहुतेक गणेश भक्तांनी ॲटोरिक्षा दुचाकी चारचाकी वाहनातून बाप्पांना विसर्जनसाठी घेऊन जातानाचे चित्र पहावयास मिळाले.
कन्या शाळेची लक्षवेधी मिरवणूक..
संकेश्वर अक्कमहादेवी कन्या शाळेच्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरलेली दिसली.शाळेच्या मुलींनी लेझिमच्या गजरात बाप्पांची शानदार विसर्जन मिरवणूक काढून लोकांचे लक्ष वेधलेले दिसले. कन्या शाळेच्या मुलींचे लेझिम आणि लाठीकाठीच्या कवायतींची लोकांतून प्रशंसा होतांना दिसली. मिरवणुकीत शाळेचे मुख्याध्यापक बी. ए. तळवार शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. हिरण्यकेशी नदीत बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
संकेश्वर पालिकेचे सहा कुत्रिम कुंड..
संकेश्वर पालिकेने गणेश भक्तांना पर्यावरणपूरक श्री मूर्तींचे विसर्जन करता यावे याकरिता तीन कुत्रीम कुंडी आणि तीन हौदांची व्यवस्था केलेली पहावयास मिळाली. निर्माल्य साठविण्याकरिता विसर्जन ठिकाणी हौद ठेवणेत आले होते. त्यामुळे गणेश भक्तांतून पालिकेचे आभार व्यक्त होताना दिसले.

याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पालिकेचे मुख्याधिकारी आर. सी. चौगुला म्हणाले, संकेश्वरातील गणेश भक्तांना पर्यावरणपूरक श्रीमूर्तींचे विसर्जन करता यावे याकरिता मठ गल्ली, नदी गल्ली, अंकले रस्ता, नेसरी गार्डन, हनुमान नगर येथे कुत्रिम कुंडी आणि हौदाची व्यवस्था केली आहे. गौरी गणपती निर्माल्य साठविण्याची वेगळी व्यवस्था केली गेली आहे. याचा उपयोग खत निर्मितीसाठी केला जाणार आहे. बाप्पांचे विसर्जन गणेश भक्तांनी पालिकेच्या कुत्रिम कुंडात करुन हिरण्यकेशी नदी आणि शेतशिवारातील विहिरीतील पाण्याचे प्रदूषण टाळावयाचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

नीलगार गणपतीच्या दर्शनासाठी लोटला जनसागर; चेंगराचेंगरीचा प्रकार 

Spread the love  संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथील प्रसिद्ध नीलगार गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी भक्तांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *