Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

शांतिनिकेतन स्कूल आयोजित मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात; 3000 स्पर्धकांचा सहभाग

  खानापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, खानापूरच्या मैदानामध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली, 3000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. या मॅरेथॉन स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भाजपा नेते, संस्थापक श्रीमहालक्ष्मी ग्रूप श्री. विठ्ठल सोमना हलगेकर होते. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा खानापूर …

Read More »

चन्नम्मा नगर वॉकर्स ग्रूपतर्फे स्नेहसंमेलन उत्साहात

  बेळगाव : चन्नम्मानगर येथील वॉकर्स ग्रुपचे दुसरे स्नेहसंमेलन नुकतेच सुभाषनगर नागरिक संघटना सभागृहात पार पडले. कार्यक्रमाला बालरोगतज्ञ डॉ. मिलिंद हलगेकर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी आप्पासाहेब गुरव होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत सदस्य, धारातीर्थी पडलेले जवान, कोरोना काळात दगावलेले नागरिक या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर सतीश बेळगुंदी …

Read More »

हलगा येथील खुनी हल्ल्यातील आरोपीला अटक

  बेळगाव : हलगा तारिहाळ रोडवर जैन बस्ती समोर धारधार शस्त्राने वार करून भररस्त्यात निर्घृण खून केलेल्या आरोपीला चार तासांतच पोलिसांना गजाआड केले. मूळचा कोंडस्कोप गावचा सध्या शिंदोळी येथे वास्तव्यास असलेल्या गदगय्या रेवणय्या पुजारी (वय 40) याच्या मानेवर वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली होती. कोंडस्कोप …

Read More »

हंचिनाळ येथे गॅस सिलेंडर, कोरोना मृतांच्या वारसांना धनादेश वितरण

कोगनोळी : हंचिनाळ के.एस (तालुका निपाणी) येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या उज्वल गॅस योजनेतून गौराबाई पाटील, छबुताई भिवसे, भाग्यश्री पाटील-चिनाप, शामबाला भिवसे, उमा जाधव या गरीब व गरजू महिलांना गॅस सिलेंडरचे वितरण आडी – हंचिनाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे अध्यक्ष बबन हावलदार,  ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.माजी सैनिक मलगौडा बसगौडा पाटील हे या अपघातात जागीच ठार झाले. ते मूळचे चिक्कोडी तालुक्यातील मुगळी गावचे आहेत. मयत मलगौडा पाटील हे त्यांचे नातेवाईक लक्ष्मी पाटील यांच्यासह …

Read More »

माउंट अबू राष्ट्रीय पत्रकार संमेलनासाठी बेळगावातील पत्रकार रवाना

  बेळगाव : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने दिनांक 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी बेळगावातून पत्रकार आज शनिवारी रवाना झाले आहेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी अबू रोड शांतीवन येथे राष्ट्रीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात येत …

Read More »

अमृत महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक व प्राईड सहेली यांच्यातर्फे विविध स्पर्धा

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक यंदा आपले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळ व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जायंट्स प्राईड सहेली यांच्या संयुक्त विद्यमानाने खालील स्पर्धा अयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमधील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीस प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह दिली जातील अशी माहिती मंडळाचे …

Read More »

आजपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

  अफगाणिस्तान-श्रीलंका सलामीची लढत दुबई : कमालीच्या अनिश्चिततेनंतरही लोकप्रिय असलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आशियाई देशांमधील रणसंग्रामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. आशियाई वर्चस्वाचे उद्दिष्ट असले, तरी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच उपखंडातील संघ आपली रणनीती निश्चित करेल. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढतीने या स्पर्धेला प्रारंभ होईल. अफगाणिस्तान-श्रीलंका संघांदरम्यान सलामीची लढत असली, …

Read More »

कर्नाटकात २० हजार अंगणवाड्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रयोग

शिक्षण मंत्र्यांची माहिती, अभ्यासक्रम तयारीसाठी सहा समित्या बंगळूर : शिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास विभागाच्या सहकार्याने, अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करणार आहे. त्यासाठी राज्य अभ्यासक्रमाचे फ्रेमवर्क तयार करण्यासाठी आधारभूत काम करेल. राज्यभरातील २० हजार अंगणवाड्यांमध्ये सरकार प्रथम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रयोग करणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 11 वाजता शिवस्मारक खानापूर येथे बोलाविण्यात अली आहे. यावेळी भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांचा पुतळा कारखाना आवारात उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात पाठिंबा दर्शविण्यासाठी आपले विचार व्यक्त …

Read More »